शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर माझ्याशी दोन हात करा; एलाॅन मस्क यांचे थेट पुतीन यांना द्वंद्वयुद्धाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 06:34 IST

एलाॅन मस्क यांचे युक्रेनसाठी थेट पुतीन यांना द्वंद्वयुद्धाचे आव्हान

न्यूयॉर्क : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस तीव्र हाेत आहे. काेणीही माघार घेण्यास तयार नाही. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलाॅन मस्क यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना शिंगावर घेतले आहे. पुतीन यांना त्यांनी थेट द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले असून, डाव युक्रेनवर राहणार आहे, असे ट्वीट करून मस्क यांनी रणशिंग फुंकले.

रशिया-युक्रेनमध्ये १९ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. वाटाघाटीच्या चार फेऱ्यांनंतरही युद्ध थांबण्याची काेणतीही चिन्हे दिसत नाहीत. रशियाने वाटाघाटीसाेबतच युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्लेही तीव्र केले आहेत. त्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती बिकट हाेत आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक नागरिकांचा या युद्धात बळी गेला आहे. या कठीणप्रसंगी एलाॅन मस्क यांनी सातत्याने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी कायम पुतीन यांना जाहीरपणे विराेध केला आहे. आता तर त्यांनी पुतीन यांना थेट द्वंद्वयुद्धाचे आव्हान देऊन दंड थाेपटले आहेत.

मस्क यांचे ट्विटमस्क यांनी रशियन भाषेचा वापर करून ट्वीट केले. त्यात त्यांनी लिहिले, की मी व्लादिमीर पुतीन यांना द्वंद्वयुद्धाचे आव्हान देताे. डाव युक्रेनवर आहे. तुम्ही या द्वंद्वासाठी तयार आहात का, असे आणखी एक ट्वीट करून त्यांनी त्यात रशियाच्या राष्ट्रपतींचे अधिकृत हँडलला टॅग केले आहे.

युक्रेनला अशीही मदतयुद्धादरम्यान युक्रेनची इंटरनेट सेवा काेलमडली हाेती. अशावेळी मस्क यांनी आपल्या कंपनीचे स्टारलिंक सॅटेलाइट पाॅइंट युक्रेनला देऊन इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी मस्कशी दूरध्वनीवरून चर्चा केली हाेती.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया