महाराजगंज : उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील सोनौली येथील भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ जणांना बुधवारी सुरक्षा दलांनी अटक केली. हे सर्व जण पाकव्याप्त काश्मिरातून आले होते.या आठ जणांना सीमा चौकीवर तपासणीसाठी रोखण्यात आले. त्या वेळी त्यांनी आपली ओळख पटविणारे कोणतेही वैध दस्तऐवज दाखविले नाही. त्यानंतर, या आठही जणांना एसएसबी आणि स्थानिक पोलिसांनी स्थानबद्ध केले.
पाकव्याप्त काश्मिरातील आठ जणांना अटक
By admin | Updated: June 9, 2016 05:42 IST