शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तमध्ये पोलिसांनी केला 40 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 11:10 IST

इजिप्त पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाईला सुरुवात केली असून यामध्ये 40 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देइजिप्त पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाईला सुरुवात केली असून यामध्ये 40 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गिझा प्रशासकीय हद्दीत आणि उत्तर सिनाई द्वीपकल्पात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात हे संशयित मारले गेले असे माहिती अंतर्गत मंत्रालयाने दिली.शस्त्रास्त्रे, दारुगोळा, बॉम्ब बनविण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणावर सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गिझा - कैरो येथील गिझा पिरॅमिडजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामध्ये व्हियतनामचे तीन पर्यटक आणि त्यांच्या गाईडचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर इजिप्त पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाईला सुरुवात केली असून यामध्ये 40 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गिझा प्रशासकीय हद्दीत आणि उत्तर सिनाई द्वीपकल्पात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात हे संशयित मारले गेले असे माहिती अंतर्गत मंत्रालयाने दिली आहे. 

सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, संशयित देशाविरुद्ध, तसेच पर्यटक संस्था आणि चर्चवर अनेक हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकले. गिझामध्ये टाकलेल्या छाप्यात पहिल्या ठिकाणी 14 तर दुसऱ्या ठिकाणी 16 जण ठार झाले. शस्त्रास्त्रे, दारुगोळा, बॉम्ब बनविण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणावर सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :Blastस्फोटterroristदहशतवादी