शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भूकंप बळींची संख्या २,०१२, मोरोक्कोत भूकंपामुळे हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:36 IST

Earthquake In Morocco: साखरझोपेत असतानाच आलेल्या मोरोक्कोमधील विनाशकारी भूकंपात मृतांची संख्या २ हजारपेक्षा अधिक झाली असून, किमान २,०५९ जण जखमी झाले आहेत. यातील १,४०४ जणांची प्रकृती गंभीर आहे.

मराकेश - साखरझोपेत असतानाच आलेल्या मोरोक्कोमधील विनाशकारी भूकंपात मृतांची संख्या २ हजारपेक्षा अधिक झाली असून, किमान २,०५९ जण जखमी झाले आहेत. यातील १,४०४ जणांची प्रकृती गंभीर आहे. अनेक कुटुंबे झोपेत असल्याने भूकंपानंतर घराबाहेर पडण्यात अपयशी ठरली, यामुळे ती ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या येथे बचावकार्य वेगात सुरू असून, त्यातही अनेक अडथळे येत आहेत.

मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अल-हौज प्रांतात सर्वाधिक १,२९३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. किमान २,०५९ लोक जखमी झाले असून, अनेकांची प्रकृती गंभीर आहे. येथील ३ लाख लोकांना भूकंपाचा फटका बसला आहे. भूकंपानंतर मोरोक्को सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मोरोक्कोमध्ये शुक्रवारी ६.८  रिक्टर स्केलचा भूकंप झाला, जो गेल्या १२० वर्षांतील देशातील सर्वांत भीषण भूकंप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक देशांच्या नेत्यांनी मोरोक्कोला मदत करण्याची घोषणा केली आहे.

भारतीयांना फटका बसला का? nमोरोक्कोमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू अथवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, अशी माहिती येथील भारतीय दूतावासाने दिली आहे. nआम्ही भारतीय लोकांच्या संपर्कात असून, नागरिकांनी संयम बाळगावा. भारतीय नागरिक कोणत्याही मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकतात, तो २४ तास उपलब्ध आहे. या कठीण काळात मोरोक्कोला मदत करण्यास भारत तयार आहे, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

भूकंपामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना गमावले आहे. दुर्घटनेची माहिती नातेवाइकांना देताना त्यांच्या डोळ्यातून पाणी थांबत नाहीये.  येथे लोकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आम्हाला रुग्णवाहिकांची नितांत गरज आहे. लोकांना अन्न आणि तंबूंची गरज आहे. कृपया आम्हाला वाचवा, असे आवाहन स्थानिक नागरिक करत आहेत.

म्हणे... जगाचा शेवट होत आहे...- भूकंप केंद्राच्या सुमारे ४५ किलोमीटर ईशान्येकडील भागात अनेक नागरिक मातीच्या विटांपासून बनवलेल्या घरांमध्ये राहतात. - आता येथील अनेक घरे कोसळली असून, केवळ पडलेले मोठमोठे ढिगारे दिसत आहेत. आम्हाला एक मोठा हादरा जाणवला, जणूकाही हा  जगाचा शेवट आहे असे वाटते. - केवळ १० सेकंदात आमचे सर्व होत्याचे नव्हते झाले, असे स्थानिक रहिवासी अयुब यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार -नोरा फतेहीभूकंपग्रस्त मोरोक्कोला मदत दिल्याबद्दल अभिनेत्री नोरा फतेहीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे आभार मानले आहेत. नोरा ही मोरोक्कन वंशाची कॅनेडियन कलाकार आहे. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत भारत करत आहे. या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार! मदतीचा हात पुढे करणाऱ्या पहिल्या देशांमध्ये तुम्ही होता. मोरोक्कन लोक आपले खूप आभारी आणि कृतज्ञ आहेत! जय हिंद, असे तिने म्हटले.

टॅग्स :EarthquakeभूकंपInternationalआंतरराष्ट्रीय