शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावर धुळीचा राक्षस; वेग तब्बल ३७३ किमी प्रतितास; नासाने टिपली छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 05:48 IST

वावटळी इतक्या प्रचंड असतात की, त्या हजारो किलोमीटरपर्यंत पसरतात आणि सूर्यप्रकाश अडवतात.

वॉशिंग्टन : नासाच्या एक्स्प्रेस आणि एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटर या मोहिमांदरम्यान टिपलेल्या छायाचित्रांमध्ये मंगळ ग्रहावर घोंघावणाऱ्या धुळीच्या वावटळी स्पष्ट दिसत आहेत. या वादळांना ‘डस्ट डेव्हिल’ म्हटले जाते.

या वावटळी इतक्या प्रचंड असतात की, त्या हजारो किलोमीटरपर्यंत पसरतात आणि सूर्यप्रकाश अडवतात. हा वेग ३७३ किमी प्रतितास इतका नोंदवला गेला आहे. या वाळूच्या लाटांना “स्ट्रीक डस्ट डेव्हिल” म्हणजेच धुळीचा राक्षस असे म्हटले जाते. हे वादळ काही तास ते काही दिवस टिकू शकते. मंगळाच्या पृष्ठभागावर हे सारे नाट्य घडत असते.

आगामी काळात या ग्रहावर अंतराळवीर जाणार म्हणून...मंगळावरील वादळांसंदर्भातील ही निरीक्षणे त्या ग्रहावरील वातावरणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. या वादळांमुळेच त्या ग्रहाचे तापमान, हवामान तसेच भविष्यातील मानवसृष्टीच्या शक्यतेचा अंदाज घेता येतो. आगामी काळात या ग्रहावर अंतराळवीर जाणार आहेत, त्यामुळे तेथील धुळीच्या वादळांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे नासाच्या सूत्रांनी सांगितले.  

मंगळ ग्रहाची वैशिष्ट्येरंग व स्वरूप : मंगळाला “लाल ग्रह” म्हटले जाते.व्यास : सुमारे ६७७९ कि.मी. पृथ्वीपेक्षा सुमारे अर्ध्या आकाराचा आहे.गुरुत्वाकर्षण : मंगळाचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या सुमारे ०.३८ पट आहे. म्हणजेच एखादी वस्तू पृथ्वीवर १० किलोची असेल, तर मंगळावर त्या वस्तूचे वजन ३.८ किलो इतके भरेल.दिवस व वर्ष : एक मंगळदिवस = २४ तास ३७ मिनिटे.मंगळावरील तापमान खूपच थंड असते. तिथे सरासरी तापमान-६० अंश सेल्सियस (कधी-१२५ ते  २० अंश सेल्सियसपर्यंत).वातावरणात बहुतांश कार्बन डायऑक्साइड (९५ टक्के) आहे. 

मंगळावर आहे ऑलिम्पस मॉन्स हा सर्वांत मोठा पर्वतत्या ग्रहावरील सर्वांत मोठा पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा असून तो सौरमालेतील सर्वांत उंच पर्वत आहे.त्या ठिकाणी व्हॅलिज मरिनरिज ही मंगळावरील दरी ही पृथ्वीवरील ग्रँड कॅनियनपेक्षा हजारपट मोठी आहे.तिथे उत्तर व दक्षिण ध्रुवांवर पाणी आणि कार्बन डायऑक्साइडच्या बर्फाचे थर आहेत. उन्हाळ्यात हे वितळतात आणि हिवाळ्यात पुन्हा गोठतात.मंगळाचे फोबोस, डायमोस हे २ लहान चंद्र आहेत: या ग्रहाच्या पृष्ठभागावर एकेकाळी पाणी वाहत होते, याचे पुरावे  सापडले आहेत. यावर आणखी संशोधन सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Giant Dust Devils Whirl on Mars; NASA Captures Stunning Images

Web Summary : NASA captured images of massive dust devils swirling on Mars at speeds up to 373 kmph. These storms impact the planet's temperature and are crucial for future manned missions, aiding in understanding Martian climate and habitability, with ongoing research revealing past water presence.
टॅग्स :Marsमंगळ ग्रह