शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Priyanka Sohoni: UN परिषदेत माईक बंद पडला, तरीही न थांबता चीनला खडेबोल सुनावले; कोण आहे प्रियंका सोहनी? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 13:18 IST

Who is Priyanka Sohni: यूएन परिषदेत बोलताना भारताच्या प्रथम सचिव प्रियंका सोहनी यांचा माइक मध्येच बंद पडला, पण त्यांनी न थांबता चीनवर सडेतोड हल्लाबोल केला. 

भारतानं संयुक्त राष्ट्र परिषदेत चीनच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह' (BRI) आणि त्यासंदर्भातील महत्त्वाकांक्षी योजनांचा कडाडून विरोध केला. भारताकडून सचिव प्रियंका सोहनी यांनी चीनला खडेबोल सुनावले. एक वेळ अशीही आली की सोहनी बोलत असताना त्यांचा माइक बंद पडला होता. पण त्यांनी पुन्हा आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली आणि चीनला CPEC संदर्भात गैरकारभाराचा आरसाच दाखवला. सोहनी यांचं भाषण झाल्यानंतर चीनी परिवहन मंत्री ली शियोपिंग यांनी माइक बंद झाल्याच्या घटनेबाबत सोहनी यांची माफी देखील मागितली. 

अचानक माइक बंद आणि सुरू झाला दुसऱ्याच वक्त्याच्या व्हिडिओ१४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत चीनच्या अध्यक्षतेखाली आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अचानक माइक बंद झाल्यानं संभ्रम निर्माण झाला होता. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी काही मिनिटांचा अवधी लागला. गडबड इतकी झाली की सोहनींचा माइक बंद तर झालाच. पण मध्येच पुढच्या वक्त्याचा एक व्हिडिओ स्क्रिनवर सुरू झाला. पण संयुक्त राष्ट्राचे महासचिव लियू झेनमिन यांनी वेळीच तो थांबवला. 

झेनमिन यांनी पुढाकार घेत भारतीय दूतावासाच्या सचिव प्रियंका सोहनी यांना आपलं भाषण सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्यावर झेनमिन यांनी सर्वांची माफी देखील मागितली. 

चीनला आरसा दाखवलाप्रियंका सोहनी यांनी कोणतीही तक्रार न करता पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि थेट मुद्द्याला हात घातला. "आपल्याला भौतिक संपर्क वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायांकडून खूप अपेक्षा आहेत. सर्वांना समान आणि संतुलित पद्धतीनं व्यापक स्वरुपात आर्थिक लाभ व्हावा असं आमचं म्हणणं आहे. संमेलनात बीआरआयचा उल्लेख केला गेला. मला इथं विशेष उल्लेख करावा वाटतो की जिथं चीनच्या बीआरआय योजनेमुळे भारतावर खूप मोठा परिणाम झाला आहे. तथाकथित चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोअरमध्ये त्याचा समावेश होणं हे भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्यासारखं आहे", असं स्पष्ट शब्दांत सोहनी यांनी आपलं मत व्यक्त केलं. 

कोण आहेत प्रियंका सोहनी?प्रियंका सोहनी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. चीनमधील भारतीय दूतावासाच्या त्या प्रथम सचिव आहेत. त्यांच्या ट्विटर हँडलवरील माहितीनुसार त्यांना वाचन, इतिहास, कला, निसर्ग, तंत्रज्ञान आणि कायदे विषयात आवड आहे. 

टॅग्स :chinaचीनunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ