शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

सौदीत अग्निकल्लोळ; सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:17 IST

सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनीच्या दोन रिफायनरींवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे.

रियाध - सौदी अरेबियातील सरकारी तेल कंबनी असलेल्या अरामकोच्या दोन रिफायनरींवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर या रिफायनरींमध्ये मोठी आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार अरामको या सरकारी कंपनीच्या दोन मोठ्या तेल रिफायनरींना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. 

या हल्ल्यानंतर लागलेल्या भीषण आगीचा व्हिडीओ समोर आले आहे. अरामकोची सर्वात मोठी रिफायनरी असलेल्या बकीक येथे हल्ल्यानंतर धुराचे साम्राज्य पसरले होते. तसेच सौदीमधील खुरौस या तेलक्षेत्रात असलेल्या दुसऱ्या रिफायनरीवरही ड्रोन हल्ला करण्यात आला. त्यानंतर तिथेही मोठी आग लागली. दरम्यान, दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे वृत्त सौदी अरेबियातील सरकारी प्रसारमाध्यमांनी  दिले आहे.  सौदी अरेबियामध्ये अशाप्रकारचे हल्ले यापूर्वीही झाले  होते. त्या हल्ल्यांसाठी येमेनमधील इराण समर्थित हुती बंडखोरांना अशा हल्ल्यांसाठी जबाबदार धरले गेले होते. मात्र अरामको कंपनीवर झालेल्या हल्लांमागे कुणाचा हात आहे, याचा उल्लेख सौदी प्रसारमाध्यमांनी केलेला नाही.  दरम्यान, हुती बंडखोरांच्या एका प्रवक्त्याने दावा केला की, या हल्ल्यासाठी दहा ड्रोन पाठवण्यात आले होते. दरम्यान, लष्कराचे प्रवक्ते याह्या सारए यांनी अल-मसिरह टीव्हीला सांगितले की, सौदी अरेबियावर भविष्यकाळात अशाप्रकारचे अजून हल्ले होऊ शकतात. हा हल्ला मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे जो हुती बंडखोरांनी घडवून आणला आहे. तसेच या हल्लासाठी सौदी सरकारमधील काही प्रतिष्ठित व्यक्तीनींही मदत केली आहे.''  मात्र सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी हुती बंडखोरांनी केलेल्या दाव्याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.  

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प