शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! एका कबुतराला मारण्याची शिक्षा 5,84,220 रुपये; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 13:32 IST

जपानमध्ये पक्ष्यांना विशेष कायदेशीर संरक्षण मिळाले असून कबुतरही या कायद्याच्या कक्षेत येतात.

जगातील अनेक देशांमध्ये कबूतर ही एक मोठी समस्या बनली आहे. रोग पसरवण्यापासून अनेक गोष्टीसाठी कबुतराला जबाबदार धरले जात आहे. जपानही यापासून मागे नाही. मात्र जपानमध्ये पक्ष्यांना विशेष कायदेशीर संरक्षण मिळाले असून कबुतरही या कायद्याच्या कक्षेत येतात. जपानच्या वन्यजीव कायद्यानुसार, कबूतर किंवा इतर पक्षी घरातून किंवा बाल्कनीतून हाकलून लावता येत नाहीत किंवा पक्ष्यांची अंडी आणि घरट्यांशी छेडछाड करता येत नाही.

कायद्यानुसार, जर तुम्हाला तुमच्या घरातून, बाल्कनीतून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून कबुतर उसकवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. वाहनचालकांसाठीही विशेष मार्गदर्शक तत्त्वे आहेत. कायद्यानुसार कबुतरे बसली असतील किंवा रस्ता ओलांडत असतील तर ट्रॅफिक सिग्नल हिरवा असला तरीही चालकाला आपले वाहन थांबावे लागेल.

सध्या एका प्रकरणाच्या निमित्ताने जपानमध्ये या कायद्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या महिन्यात 3 डिसेंबर रोजी एका 50 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो रस्ता ओलांडत होता, ट्रॅफिक सिग्नलही हिरवा होता, पण त्याच दरम्यान कबुतरांचा कळप रस्त्यावर आला. असे असतानाही चालकाने ब्रेक लावला नाही, उलट वेग वाढवला. यामुळे एका कबुतराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या कबुतराचे शवविच्छेदन करण्यात आले. कबुतराचा मृत्यू ट्रॉमा व शॉकमुळे झाल्याचे पशुवैद्यकांनी सांगितले.

1 मिलियन येन दंड किंवा 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा जपानच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, या प्रकारच्या गुन्ह्यासाठी एक मिलियन जपानी येन (सुमारे 5,84,220 रुपये) दंड किंवा 1 वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे. अशा परिस्थितीत चालकाला शिक्षा किंवा दंड भरावा लागू शकतो. दरम्यान, जपानमध्ये 2021 आणि 2022 मध्ये स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनंतर सुमारे 4000 कबुतरे मारली गेली किंवा त्यांची अंडी आणि घरटी काढून टाकण्यात आली होती.

टॅग्स :Japanजपानpigeonsकबुतर