शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 08:37 IST

इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धबंदी करण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तानची विश्वासार्हता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

US Iran Ceasefire For 2 Weeks: इराणला उद्धवस्त करण्याचा इशारा दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाने मोठा दिलासा दिला आहे. मात्र, या ऐतिहासिक घडामोडीत मध्यस्थीचा आव आणणाऱ्या पाकिस्तानची एका तांत्रिक चुकीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमुळे पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण इस्लामाबादमधून ठरतेय की वॉशिंग्टनमधून? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

नेमकं प्रकरण काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करण्यापूर्वी शहबाज शरीफ यांनी एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी ट्रम्प यांना इराणवरील डेडलाईन वाढवण्याची आणि मुत्सद्देगिरीला संधी देण्याची विनंती केली होती. तसेच इराणला होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्याचे आवाहन केले होते. मात्र, ही पोस्ट प्रसिद्ध होताच नेटकऱ्यांनी त्याची एडिट हिस्ट्री तपासली आणि एक मोठा गौप्यस्फोट झाला. शरीफ यांनी रात्री १२ वाजून ४६ मिनिटांनी केलेल्या पोस्टवर "Draft – Pakistan’s PM Message on X" असे लिहिलेले होते. १२ वाजून ४७ मिनिटांनी ही पोस्ट एडिट करण्यात आली. ही ओळ नंतर घाईघाईत हटवण्यात आली, पण तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट्स जगभरात व्हायरल झाले होते. 

'ड्राफ्ट' शब्दावरून संशयाची सुई

एखाद्या देशाचा पंतप्रधान स्वतःच्या पोस्टमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी मेसेज असा उल्लेख का करेल? हा प्रश्न विचारला जात आहे. सोशल मीडियावरील ही स्क्रिप्ट बाहेरून आली असल्याचा दावा केला जातोय. हा मेसेज पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने तयार केलेला नसून, तो अमेरिकेतील व्हाईट हाऊस किंवा ट्रम्प यांच्या टीमकडून पाठवण्यात आला होता. शरीफ यांनी तो केवळ कॉपी-पेस्ट केला आणि त्यातील सूचना हटवायला ते विसरले. ट्रम्प पाकिस्तानवर नियंत्रण मिळवत असून शहबाज शरीफ केवळ त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असाही आरोप आता होत आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेसाठी आता इस्लामाबादची निवड करण्यात आली आहे. अशा वेळी पाकिस्तान स्वतःला मोठा मध्यस्थ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या एका ट्वीटमुळे पाकिस्तानची प्रतिमा दुसऱ्याच्या इशाऱ्यावर चालणारा देश अशी झाली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांच्यासह स्टीव्ह विटकॉफ आणि मार्को रुबियो यांसारख्या अमेरिकन नेत्यांना टॅग करण्यात आले होते.

पुढे काय?

दरम्यान, येत्या दोन आठवड्यात इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेतून काही ठोस निष्पन्न होणार की ही केवळ ट्रम्प यांची रणनीती आहे, हे स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's role in Trump-Iran truce questioned after 'copy-paste' message.

Web Summary : A 'copy-paste' error on a Shahbaz Sharif tweet raised questions about Pakistan's role in the Trump-Iran ceasefire. The post's edit history revealed a draft message, suggesting external influence on Pakistan's foreign policy, sparking controversy and accusations of subservience to US interests.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरPakistanपाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प