शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

कोरोना विरोधी बहुतांश लसी डेल्टा व्हेरिअंटवर प्रभावी, अमेरिकी वैज्ञानिक म्हणाले लवकरात लवकर लस घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 22:42 IST

जगातील अनेक देश सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा सामना करत आहेत आणि काही ठिकाणी या व्हेरिअंटच्या आणखी एका लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जगातील अनेक देश सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा सामना करत आहेत आणि काही ठिकाणी या व्हेरिअंटच्या आणखी एका लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात अमेरिकेचे मुख्य सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी गुरुवारी कोरोना विरोधी बहुतेक लसी वेगानं पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात प्रभावी असल्याचं म्हटलं आहे. यासोबत त्यांनी नागरिकांना जितकं लवकर होईल तितक्या लवकर लसीकरण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे. 

व्हाइट हाऊसच्या कोविड-१९ कृतीदल आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. फौसी यांनी महत्वाची माहिती यावेळी दिली. इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार फायझर-बायो अँड टेकची लस डेल्टा व्हेरिअंटवर ९६ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर अॅस्ट्राझेनेकाच्या दोन लसी रुग्णालयात दाखल होण्याविरोधात ९२ टक्के प्रभावी ठरली आहे. 

जॉन्सन अँड जॉन्सनचा 'सिंगल डोस'चा दावाजॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं केवळ एक डोस घ्यावा लागेल अशा लसीची निर्मिती केली आहे. या लसीचा इम्युनिटी सिस्टमवर जवळपास आठ महिने प्रभाव राहतो असा दावा करण्यात आला आहे. तसंच या लसीची कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटवरही चाचणी करण्यात आली आहे. यात पहिल्या चाचणी आठ जणांना जॉन्सन अँड जॉन्सन लसीचे डोस देण्यात आले आहे. तर दुसरी चाचणी बोस्टन रुग्णालयात लस घेतलेल्या २० जणांचीही चाचणी करण्यात आली. यात जॉन्सनची लस कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटवर देखील प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. 

कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट सर्वात धोकादायकयेत्या काळात कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट सर्वात धोकादायक व्हेरिअंट ठरू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेलं आहे. सध्या डेल्टा व्हेरिअंट जगात ९६ देशांमध्ये पसरला असून डॉ. फौसी यांनी डेल्टा व्हेरिअंटला आजवरचा सर्वात खतरनाक व्हेरिअंट संबोधलं आहे. डेल्टा व्हेरिअंटमध्ये एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संसर्ग होण्याची सर्वाधिक क्षमता आहे. याशिवाय आरोग्यावर याचा घातक परिणाम होतो, असंही डॉ. फौसी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या