शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता चिंता नको... एआय देईल भूकंपाची पूर्वकल्पना; आठवड्यापूर्वीच देईल धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 06:00 IST

टेक्सास विद्यापीठाकडून सात महिन्यांपासून सुरू असलेल्या एका संशोधनानंतर, एआयच्या मदतीने भूकंपाची पूर्वसूचना एक आठवड्यापूर्वीच मिळणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विविध प्रकारच्या संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा  सध्या मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यातून मानवासाठी अनेक महत्त्वाचे शोध वा फायदे समोरही येत आहेत. टेक्सास विद्यापीठाकडून सात महिन्यांपासून सुरू असलेल्या एका संशोधनानंतर, एआयच्या मदतीने भूकंपाची पूर्वसूचना एक आठवड्यापूर्वीच मिळणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यंत्रणेची अचूकता सुमारे ७० टक्के असल्याचे या प्रकल्पातील संशोधकांचे म्हणणे आहे.

कसे झाले संशोधन? ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठाने विकसित केलेल्या एआय मॉडेलकडून चीनमध्ये मागील सात महिने प्रयोग सुरू होता. रिअल टाइम प्रणालीमध्ये भूगर्भातील हालचालींची माहिती गोळा करण्यात आली. शिवाय यापूर्वी आलेल्या भूकंपाची माहितीही या मॉडेलला देण्यात आली. सर्व माहितीचे विश्लेषण करून चीनमध्ये ७ महिन्यांमध्ये आलेल्या छोट्या-मोठ्या भूकंपांपैकी ७० टक्के भूकंपाचा आठवडाभरापूर्वी इशारा दिला.

३०० किमी क्षेत्रात इशाराएआय मॉडेलने सुमारे ३०० किमी परिसरातील १४ भूकंपांची अचूक पूर्वकल्पना दिली. विशेष म्हणजे भूकंप किती रिश्टर स्केलचा येईल, हेही सांगण्यात आले. काही भूकंपाचा अंदाज चुकलाही. परंतु, अधिक संशोधन आणि प्रयोगानंतर त्याची अचूकता वाढवता येईल, असे संशोधकांनी सांगितले.

एआयमुळे वाढली विजेची मागणीnजगभरात एआयआधारित मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहेत. त्यासाठी विजेची मागणीही अधिक वाढली आहे. ही मागणी २०२७ पर्यंत नेदरलँड, अर्जेंटिना आणि स्वीडनसारख्या देशांच्या वार्षिक विजेच्या मागणीपेक्षाही अधिक असेल, nअसा अंदाज ॲमस्टरडॅम येथील विद्यापीठाच्या संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. डेटा फिडिंग, डेटा प्रोसेसिंग तसेच डेटा स्टोरेजसाठी अधिक वीज लागत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंप