शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka: दारू पिऊन हत्ती ‘चालवू’ नका! माहुतांना श्रीलंका सरकारचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 07:14 IST

Sri Lanka: माहुतांनी दारू पिऊन हत्तींवरून स्वारी करू नये असा आदेश श्रीलंका सरकारने दिला. हत्तींसह सर्वच प्राण्यांच्या संरक्षणासाठी नवा कायदा केला आहे. श्रीलंकेत पाळीव हत्तींचे हाल होत असल्याच्या घटना उजेडात आल्या होत्या. ते रोखण्यासाठी सरकार आता सक्रिय झाले आहे.

कोलंबो : माहुतांनी दारू पिऊन हत्तींवरून स्वारी करू नये असा आदेश श्रीलंका सरकारने दिला. हत्तींसह सर्वच प्राण्यांच्या संरक्षणासाठी नवा कायदा केला आहे. श्रीलंकेत पाळीव हत्तींचे हाल होत असल्याच्या घटना उजेडात आल्या होत्या. ते रोखण्यासाठी सरकार आता सक्रिय झाले आहे.इथे अनेक श्रीमंत व्यक्ती आपल्या वैभवाचे दर्शन घडविण्यासाठी हत्ती पाळतात. मात्र त्या हत्तींना क्रूर वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी वन्यजीवप्रेमींनी सरकारकडे केल्या होत्या. त्या त्रासापासून हत्ती व इतर प्राण्यांची सुटका व्हावी यासाठी नवा कायदा केला. या पाळीव हत्तींना रोज दोन ते अडीच तासात पाण्यात मस्त डुंबू द्यावे, त्यांना दररोज पाच किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतर फिरवून आणावे असा नियमही नव्या कायद्यात आहे. श्रीलंकेमध्ये सुमारे ७५०० हत्ती असून त्यातील ३०० ते ४०० हत्ती विविध लोकांनी पाळले आहेत. पाळीव हत्तींना सरकारने चक्क फोटो ओळखपत्रे दिली असून, त्यात त्यांच्या डीएनएचीही सविस्तर माहिती आहे. पाळीव हत्तीणीपासून तिच्या पिल्लाला वेगळे काढता येणार नाही. पिल्लाच्या संगोपनाकडे त्यांच्या मालकाने बारीक लक्ष दिले पाहिजे असा आदेश श्रीलंका सरकारने दिला आहे.पर्यटकांना हत्तीवरून फेरफटका मारण्याचे विलक्षण आकर्षण असते. मात्र लंकेत हत्तीच्या पाठीवर चारपेक्षा जास्त पर्यटकांना बसविण्यास बंदी आहे. हत्तींचा चित्रपटाच्या चित्रीकरणात वापर करता येणार नाही. मात्र सरकारचा एखादा प्रकल्प असेल तर त्यासाठी पशुवैद्यक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हत्तींचा चित्रीकरणात वापर केला जाईल असे श्रीलंका सरकारने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)कायदा मोडणाऱ्याला तीन वर्षांचा कारावास श्रीलंका सरकारने म्हटले आहे की, पाळीव हत्तींची दर सहा महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करावी.  जो या कायद्याचा भंग करेल, त्याच्याकडील हत्ती सरकार ताब्यात घेईल. हत्तीच्या मालकाला कायदा धाब्यावर बसविल्याबद्दल तीन वर्षांचा कारावासही होऊ शकतो.    

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका