शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सतत एकटे राहू नका, होईल मृत्यू; संशोधनातून नवीन माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 05:50 IST

मध्यमवयीनांना बसतोय फटका ; नवीन संशोधनातून माहिती समोर

टेम्पे (अमेरिका) : अनेक लोकांना एकटे राहणे आवडते. मात्र, एकटे राहण्यामुळे मोठा फटका बसत असून, मृत्यू येण्याचाही धोका असल्याचे नवीन संशोधनात समोर आले आहे. अमेरिकेतील ‘अमेरिकन सायकोलॉजिस्ट’ या प्रतिष्ठित मासिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनात याबाबत माहिती देण्यात आली आहे. १९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेले नागरिक आणि १९६५ ते १९८० दरम्यान जन्मलेल्या नागरिकांना सध्या सर्वाधिक एकटेपणा भासत आहे. अमेरिका, इंग्लंड आणि युरोपमध्येही एकटेपणाचा फटका बसत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

२००७ ते २००९ अखेरपर्यंत आलेल्या मंदीनंतर अमेरिकेतील मध्यमवयीन नागरिकांना वाईट मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा सामना करावा लागला.२०२३ मध्ये एका नियतकालिकाने एकटेपणाची समस्या महामारी बनेल, असा अंदाज व्यक्त केला होता.

जबाबदारी मोठी, आजारही वाढलेसंशोधकांनी २००२ ते २०२० पर्यंत जन्मलेल्या अमेरिका आणि १३ युरोपीय देशांमधील ५३ हजारांपेक्षा अधिक मध्यमवयीन नागरिकांच्या डेटाचा अभ्यास केला. दर दोन वर्षांनी एकटेपणाबाबत काय समस्या निर्माण झाल्या याबद्दल डेटात माहिती देण्यात आली. युरोपियन देशांतील मध्यमवयीनांच्या तुलनेत अमेरिकन मध्यमवयीन नागरिकांना एकटेपणाचा सर्वाधिक अनुभव येत आहे. अमेरिकेमधील मध्यमवयीन नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचेही यावरून आढळून आले आहे. असे असले तरी वृद्ध पालक आणि त्यांची मुले या दोघांचीही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यातच अनेक युरोपीय देशांच्या तुलनेत, अमेरिकेतील प्रौढांत सध्या नैराश्य, जुनाट आजार, वेदना आणि अपंगत्वाचे प्रमाण अधिक आहे.

एकटेपणा का धोकादायक? nएकटेपणा असल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात.nएकटेपणा हा धूम्रपानाइतकाच धोकादायक आहे.nव्यक्तीला आजार, नैराश्य, गंभीर आजार आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो.nएकटेपणा ही जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्या मानली जाते.nएकटेपणा कमी करण्यासाठी लोकांमध्ये सामाजिक बंध दृढ होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Americaअमेरिका