अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या आक्रमक स्वभावामुळे पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडले आहेत. इराणविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर केल्यामुळे ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनच टीकेची झोड उठली आहे. केवळ टीकाच नव्हे, तर आता त्यांना पदावरून हटवण्यासाठी अमेरिकन संविधानातील '२५ व्या घटना दुरुस्ती'चा (25th Amendment) आधार घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जर ही मागणी मान्य झाली, तर ट्रम्प यांना खुर्ची सोडावी लागेल आणि जेडी वेंस अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनू शकतात.
५ खासदारांची आक्रमक भूमिका
डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले होते. यानंतर अमेरिकेतील ५ प्रमुख खासदारांनी ट्रम्प यांच्या मानसिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खासदारांच्या मते, ट्रम्प आपले कर्तव्य निभावण्यास असक्षम आहेत आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे संपूर्ण जगाला युद्धाच्या दरीत लोटले जात आहे.
नेमकं काय म्हणाले खासदार?
बेक्का बालिंट: "जर ओबामा किंवा बायडेन यांनी असे शब्द वापरले असते, तर रिपब्लिकन शांत बसले असते का? ट्रम्प यांना हटवण्याची हीच योग्य वेळ आहे."
सीनेटर क्रिस मर्फी: "मी जर ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये असतो, तर आतापर्यंत २५ व्या घटना दुरुस्तीसाठी वकिलांशी चर्चा सुरू केली असती. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे लोकांचे जीव जात आहेत."
यास्मीन अन्सारी: "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांच्यामुळे संपूर्ण जग धोक्यात आहे."
काय आहे २५ वी घटना दुरुस्ती?
अमेरिकन संविधानातील २५ व्या घटना दुरुस्तीनुसार, जर राष्ट्राध्यक्ष आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या असमर्थ असतील, तर त्यांना पदावरून हटवले जाऊ शकते.
१. या प्रक्रियेसाठी आधी उपराष्ट्राध्यक्ष आणि कॅबिनेटला एक प्रस्ताव मंजूर करावा लागतो.२. जर राष्ट्राध्यक्षांनी याला विरोध केला, तर हे प्रकरण संसदेत (काँग्रेस आणि सीनेट) जाते.३. संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन-तृतीयांश बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला, तर राष्ट्राध्यक्षांना तात्काळ पद सोडावे लागते आणि उपराष्ट्राध्यक्ष उर्वरित काळासाठी पदभार स्वीकारतात.
ट्रम्प ३ दिवसांच्या रजेवर!
'एक्सप्रेस यूके'च्या वृत्तानुसार, या संपूर्ण वादानंतर आणि इराणविरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर ट्रम्प अचानक ३ दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यांच्या या रजेमुळे अमेरिकन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, दुसरीकडे इराणसोबतचा तणाव कमी होण्याचे नाव घेत नाहीये.
Web Summary : Trump faces removal calls after offensive Iran remarks. The 25th Amendment, allowing removal for incapacity, is invoked by lawmakers questioning his fitness. His abrupt vacation fuels speculation amidst rising Iran tensions.
Web Summary : ईरान पर ट्रंप की आपत्तिजनक टिप्पणी के बाद उन्हें हटाने की मांग उठी। सांसदों ने उनकी क्षमता पर सवाल उठाते हुए 25वें संशोधन का आह्वान किया, जो अक्षमता के कारण पद से हटाने की अनुमति देता है। ईरान के बढ़ते तनाव के बीच उनकी अचानक छुट्टी से अटकलें तेज।