शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे इमिग्रेशन धोरण भारतीयांसाठी लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 05:05 IST

अमेरिकी संसदेच्या मंजुरीनंतरच ट्रम्प यांचे नवे धोरण प्रत्यक्ष अमलात येईल. या धोरणाला मंजुरी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले नवे आव्रजन धोरण (इमिग्रेशन प्लॅन) भारतीयांसाठी लाभदायक ठरू शकते, असे जाणकारांना वाटते. ट्रम्प यांनी कुटुंबाला प्राधान्य देणारे सध्याचे आव्रजन धोरण बदलून केवळ गुणवत्तेला प्राधान्य देणारे धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे.अमेरिकी संसदेच्या मंजुरीनंतरच ट्रम्प यांचे नवे धोरण प्रत्यक्ष अमलात येईल. या धोरणाला मंजुरी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.सध्या विदेशी नागरिकांना अमेरिकी व्हिसा देताना अमेरिकेत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचे वैवाहिक जोडीदार, भाऊ-बहिणी आणि चुलत-मावस भाऊ-बहिणी यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. ट्रम्प यांच्या नव्या धोरणात ही व्यवस्था पूर्णत: बाद ठरविण्यात आली आहे. व्हिसा आणि ग्रीन कार्ड देताना आता उमेदवाराचे शिक्षण, इंग्रजी बोलण्याचे कौशल्य, रोजगार प्रस्ताव आणि अमेरिकी संस्कृतीत मिसळून जाण्याची क्षमता या मुद्यांवरच विचार केला जाईल.ट्रम्प यांनी म्हटले की, सध्याचे अमेरिकी आव्रजन कायदे गुणवंतांवर अन्याय करणारे आहेत. बुद्धिवंतांच्या विरोधात आहेत. बहुतांश ग्रीन कार्ड (अमेरिकी नागरिकत्व) निम्न गुणवत्ताधारकांनाच मिळाले आहेत.सध्या अमेरिकी सरकार विदेशी नागरिकांना दरवर्षी १ दशलक्ष ग्रीन कार्ड देते. त्यातील १,४०,००० ग्रीन कार्ड रोजगाराच्या आधारावर दिले जातात. उरलेले ग्रीन कार्ड कौटुंबिक निकषावर दिले जातात.ट्रम्प यांच्या प्रस्तावित धोरणात ५७ टक्के व्हिसा गुणवत्तेच्या निकषावर दिले जातील. अनेक क्षेत्रात भारतीय तरुणांची गुणवत्ता सर्वोत्तम स्वरूपाची असल्यामुळे नव्या नियमांचा लाभ भारतीयांना अधिक होईल, असे जाणकारांना वाटते.व्हिसा नाकारल्याबद्दल सरकारविरुद्ध खटलाएका उच्चशिक्षित भारतीयास एच-१बी व्हिसा नाकारल्याबद्दल सिलिकॉन व्हॅलीतील ‘एक्सटेरा सोल्युशन्स’ या आयटी कंपनीने अमेरिकी सरकारविरुद्ध खटला दाखल केला आहे. अमेरिकी नागरिकत्व व आव्रजन सेवा विभागाविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला आहे.कंपनीने प्रहर्ष चंद्र साई वेंकट अनिशेट्टी (२८) या तरुणास बिझनेस सिस्टिम अ‍ॅनॅलिस्ट म्हणून नोकरीवर घेतले होते. तथापि, त्याला अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला होता. व्हिसा नाकारण्याचा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप कंपनीने याचिकेत केला आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका