शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचे 'गोल्फ' प्रेम अन् 13 दिवसांत अमेरिकन करदात्यांचे 156 कोटी रुपये स्वाहा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 21:08 IST

Trump Golf weekends : डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ खेळण्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.

Donald Trump Golf : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गोल्फ खेळाची खूप आवड आहे. परंतु त्यांच्या या आवडीमुळे अमेरिकन करदात्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. एका अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ वीकेंड्समुळे आतापर्यंत अमेरिकन करदात्यांना $18 मिलियन जास्त नुकसान झाले आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळातील 48 पैकी 13 दिवस गोल्फ खेळण्यात घालवले आणि यावर लाखो डॉलर्स खर्च झाले. राष्ट्राध्यक्षांचा हा महागडा छंद म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे, तर समर्थक याला वैयक्तिक पसंती म्हणतात. दरम्यान, पॅलेस्टाईन समर्थकांनी शनिवारी(08 मार्च 2025) रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या टर्नबेरी गोल्फ रिसॉर्टमध्ये तीव्र निषेध केला. आंदोलकांनी भिंतींवर 'फ्री गाझा' आणि 'गाझा विक्रीसाठी नाही' अशा घोषणा लिहिल्या आणि तोडफोडही केली.

गोल्फ आणि ट्रम्पफार कमी लोकांना माहितेय की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 16 पेक्षा जास्त गोल्फ कोर्स आहेत, त्यापैकी बहुतेक युनायटेड स्टेट्स, स्कॉटलंड, आयर्लंड आणि UAE मध्ये आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या 2005 च्या पुस्तक "मला मिळालेला सर्वोत्कृष्ट गोल्फ सल्ला" मध्ये लिहिले की, "माझ्यासाठी आणि जगभरातील लाखो लोकांसाठी गोल्फ हा खेळापेक्षा अधिक आहे." 

ट्रम्प यांच्या गोल्फ ट्रिपची किंमतडोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 ते 2020 या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात गोल्फ ट्रिपसाठी एकूण खर्च $151.5 मिलयन खर्च केले होते. 2019 मध्ये गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिस (GAO) च्या अहवालानुसार, फ्लोरिडामध्ये त्यांचा शनिवार व रविवारचा खर्च $18 मिलियनवर पोहोचला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांच्या गोल्फ ट्रिप अत्यंत महाग असल्याचे म्हटले जाते. राष्ट्राध्यक्षांच्या हवाई प्रवासावरही लाखो डॉलर्स खर्च होतात. 

गोल्फ आणि राजकारणडोनाल्ड ट्रम्प यांच्या आवडीवर विरोधक टीका करत आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुट्ट्यांचा आणि वैयक्तिक आवडीचा खर्च करदात्यांनी का सोसावा? इतकी सुरक्षा आणि लष्करी संसाधनांचा वापर न्याय्य आहे का? हा सरकारी निधीचा दुरुपयोग नाही का? असे प्रश्न विचारले जात आहेत. तर, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही गोल्फ खेळायचे, पण मीडियाने त्यांना टार्गेट केले नाही. गोल्फ हा ट्रम्प यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे समर्थकांचे मत आहे.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका