शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयावर गुगल, फेसबूक संतप्त

By admin | Updated: January 29, 2017 07:53 IST

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्हिसा पॉलिसीवर टीका केली

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 29 - भारतीय मूळचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्हिसा पॉलिसीवर टीका  केली आहे. अमेरिकेच्या नव्या व्हिसा पॉलिसीद्वारे सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर जगभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. 

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ‘विदेशी अतिरेक्यांच्या अमेरिकेतील प्रवेशापासून देशाची सुरक्षा’ असे या आदेशाचे नाव आहे. या आदेशानुसार इराण, इराक, सुदान, सिरिया, लिबिया, सोमालिया आणि येमेन या देशांतील नागरिकांना ३0 दिवसांपर्यंत अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही.
 
ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे अमेरिकेत नव्याने येऊ घातलेल्या टॅलेंटसाठी अडथळा आहे. या निर्णयाचा गुगलच्या जवळपास 187 कर्मचा-यांवर परिणाम होईल असं ते म्हणाले.   या निर्णयामुळे गुगलने आपल्या प्रवासी कर्मचा-यांना माघारी बोलावलं आहे.  तर  फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीही या निर्णयावर टीका केली.   या आदेशामुळे मला चिंता वाटते. असंख्य अमेरिकींप्रमाणेच मीही स्थलांतरिताचा मुलगा आहे असं फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी  म्हटलं आहे. 
 
नोबेल पारितोषिक विजेती विद्यार्थिनी मलाला युसुफझई हिनेही ट्रम्पच्या निर्णयाचा विरोध केला आहे.  या बंदी आदेशामुळे माझे हृदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा निर्णय योग्य नाही असं ती म्हणाली.