शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसणार! शपथेपूर्वी हश मनी प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 09:26 IST

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. 

Donald Trump : वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शपथविधीपूर्वी मोठा धक्का बसणार आहे. एडल्ट स्टार स्टॉर्मी  डॅनियल्सला गप्प राहण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी (हश मनी प्रकरण) डोनाल्ड ट्रम्प यांना १० जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दरम्यान, हश मनी प्रकरणातील हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या तारखेच्या १० दिवस आधी येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. 

या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा सुनावली जाईल, असे शुक्रवारी न्यायाधीश जुआन मर्चन यांनी सांगितले. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांना तुरुंगवास होणार नाही, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिक्षेबाबत बोलताना न्यायाधीश जुआन मर्चन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, डोनाल्ड ट्रम्प यांना 'कंडीशनल डिस्चार्ज' दिला जाणार आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार नाही, असे समजते. तसेच, डोनाल्ड ट्रम्प हे सुनावणीसाठी प्रत्यक्षरित्या किंवा व्हर्च्युअल उपस्थित राहू शकतात, असेही न्यायाधीश जुआन मर्चन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

गेल्या मे महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांना ३४ आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते.  हे आरोप २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत एडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प राहण्यासाठी गुपचूप पैसे दिल्यासंबंधी होते. हे पैसे देण्याचा उद्देश एडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अफेअर असल्याचा आरोप दाबून टाकण्याचा होता. 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे होते की, त्यांनी आपले लग्न वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले आणि त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. दरम्यान, एडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियल्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधांची २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बरीच चर्चा झाली होती.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय