शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बायडेन सरकारचे 'ते' सर्व निर्णय तात्काळ रद्द करणार; शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:40 IST

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. भारतीय वेळेनुसार आज रात्री 10.30 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. दरम्यान, शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. शपथ घेताच, जो बायडेन यांनी घेतलेले सर्व 'मूर्ख' आदेश 24 तासांच्या आत रद्द केले जातील, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. याशिवाय, शपथविधीनंतर लगेच 100 महत्त्वाच्या फाइल्सवर स्वाक्षरी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा विजय मिळवत सत्तेत पुनरागमन केले. आता शपथविधीनंतर ट्रम्प अनेक मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. याची सुरुवात जुने निर्णय रद्द करण्यापासून होणार आहे. ट्रम्प यांनी सांगितल्यानुसार, शपथविधीनंतर ते लगेच बायडन सरकारमधील अनेक निर्णय रद्द करणार आहेत. याशिवाय, त्यांनी आपल्या टीमला रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा करण्याची तयारी करण्यास सांगितले आहे. 

ट्रम्प यांच्या शपथविधीला कोण उपस्थित राहणार?डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. अनेक माजी राष्ट्राध्यक्षही यात सहभागी होऊ शकतात. यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि लॉरा बुश, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन आणि माजी अध्यक्ष बराक ओबामा उपस्थित राहणार आहेत. यासोबतच टेस्लाचे सीईओ आणि ट्रम्पचे निकटवर्तीय इलॉन मस्क, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मेटा सीईओ मार्क झुकरबर्गदेखील उपस्थित राहणार आहेत. 

जाता जाता बायडन यांचा मोठा निर्णयडोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी निवर्तमान अध्यक्ष जो बायडेन यांनी डॉ. अँथनी फौकी, जनरल मार्क मिली (निवृत्त) आणि '6 जानेवारी कॅपिटल हिल हल्ल्या'च्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांना माफ केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान वारंवार इशारा दिला होता की, ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बायडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करतील. या निर्णयाचा उद्देश ट्रम्प प्रशासनाकडून या लोकांना संरक्षण देणे हा आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका