शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump, US Election 2024: "...म्हणून हल्लेखोराचा नेम चुकला अन् देवाने मला वाचवलं"; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 11:48 IST

Donald Trump on Attack Survival: रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यात गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती

Donald Trump on Attack Survival: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियामध्ये आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मोठे विधान केले. त्या हल्ल्यानंतर मी जास्त धार्मिक झालो आहे. देवाने मला एका खास कारणासाठी वाचवल्यासारखे वाटते आहे, असा दावा त्यांनी केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प फॉक्स न्यूजच्या लाईफ लिबर्टी अँड लेविन या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले आणि अनेक दावेही केले.

शोचे होस्ट मार्क लेविन यांच्याशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, "देवाने मला वाचवले आहे जेणेकरून ते अमेरिकेच्या विकासात आणखी जास्त योगदान देऊ शकेन. अमेरिकेला अधिक मजबूत करू शकेन. कारण सध्या आपला देश खूप कमकुवत आणि विखुरलेला आहे." या शोमध्ये बोलत असताना तो धार्मिक गोष्टींवर भरभरून बोलले. याआधीही ट्रम्प यांनी दावा केला होती की, देवाने त्यांचा जीव वाचवला आहे. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, आज मी फक्त देवामुळेच जिवंत आहे. मात्र त्यामागे 'देवाला माझ्या हातून अमेरिकेचा विकास हवा असेल', हा दावा त्यांनी नव्यानेच केला.

हल्लेखोराचा नेम का चुकला?

शोमध्ये ट्रम्प यांनी त्यांच्यावरील हल्ल्याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते देखील शेअर केले. ते म्हणाले की तुम्ही कोणत्याही तज्ज्ञाशी बोललात तर ते म्हणतील की माझ्या जगण्याची शक्यता नव्हती, परंतु मला वाटते की हल्लेखोर घाईघाईत होता. त्यामुळे तो चुकला. ट्रम्प यांनी सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांचेही कौतुक केले आणि सांगितले की जर त्यांनी त्वरित कारवाई केली नसती तर हा हल्ला लास वेगासमधील घटनेसारखा झाला मोठा असता, त्या हल्ल्यात एका माथेफिरूने आपल्या घराच्या छतावर उभे राहून जमावावर अंदाधुंद गोळीबार केला होता.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाUS ElectionAmerica Election