शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला जबर दणका

By admin | Updated: May 23, 2017 18:58 IST

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला मोठा धक्का देणारं पाऊल उचललं आहे. पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचं कर्जात रूपांतर केलं जावं असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 23 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला मोठा धक्का देणारं पाऊल उचललं आहे. पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीचं कर्जात रूपांतर केलं जावं असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. व्हाइट हाऊसने याबाबत माहिती दिली. 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आर्थिक वार्षिक बजेटमध्ये हा प्रस्ताव ठेवला आहे.  या प्रस्तावात पाकिस्तानला अमेरिकेकडून लष्करी सामग्री खरेदी करण्यासाठी देण्यात येणा-या आर्थिक मदतीचं कर्जामध्ये रूपांतर केलं जावं असं म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनाने हा केवळ प्रस्ताव ठेवला असून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार परराष्ट्र मंत्रालयाकडे असणार आहे. ट्रम्प यांनी हे पाऊल विदेशी मदतीचं बजेट कमी करण्याच्या दृष्टीकोनातून उचललं असल्याचं म्हटलं जात आहे जेणेकरून अमेरिकेी सेनेचा वाढता खर्च पूर्ण करण्यास मदत होईल. 
 
अमेरिकेचा हा प्रस्ताव केवळ पाकिस्तानसाठी नसून अनेक देशांसाठी आहे. ज्या देशांना अमेरिकेने लष्करी सामग्रीसाठी मदत केली आहे त्या सर्व देशांच्या  आर्थिक मदतीचं कर्जात रूपांतर केलं जावं असा प्रस्ताव आहे. 
 
नवाज शरीफांसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकला सुनावले खडे बोल-
यापुर्वी काल डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणात मुस्लिम देशांच्या नेत्यांना दहशतवादाचा खात्मा करण्याचं आवाहन केलं होतं. या पवित्र धरतीवर दहशतवादाला थारा देऊ नका. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफही उपस्थित होते. दहशतवाद जगामध्ये पसरतोय. दहशतवादाचे जगभरातील जवळपास सर्वच देश बळी आहेत. काही देश दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेपासून भारत आणि रशियासारखे देशही प्रभावित होत आहेत, धर्माच्या नावाखाली चाललेला दहशतवादाचा खेळ आता बंद झाला पाहिजे असं ट्रम्प म्हणाले होते.