शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 08:29 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असताना ट्रम्प यांनी गंभीर इशारा दिला आहे.

Donald Trump on Elon Musk: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्यातील वाद तूर्तास तरी मिटण्याची चिन्हे नाहीत. डोनाल्ड ट्रम्प हे इलॉन मस्कशी तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसत आहे. मला मस्कशी संबंध सुधारण्याची कोणतीही इच्छा नाही, असं ट्रम्प यांनी शनिवारी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी मस्क यांना गंभीर इशाराही दिला. जर मस्क यांनी येत्या निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही ट्रम्प यांनी म्हटलं.

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ते त्यांच्या धोरणांमुळे चर्चेत आहेत. ट्रम्प यांनी उचलेल्या पावलांमुळे त्यांना टीकेला तर सामोरे जावेच लागले पण त्यांच्यासोबत असलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांनीही त्यांची साथ सोडली. त्यानंतर दोघांनाही एकमेकांवर जोरदार टीका केली. मात्र आता ट्रम्प यांनी  मस्क यांना उघडपणे इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्कबद्दल विचारही करत नसल्याचे म्हटले आहे. सीएनएनशी बोलताना ट्रम्प यांनी मी काही काळ मस्कशी बोलणारही नाही, असं म्हटलं आहे. इलॉन मस्क यांनी ट्रम्प सरकारमधून पायउतार झाल्यापासून उघडपणे त्यांचा विरोध सुरु केला आहे. गुरुवारी रात्री मस्क आणि ट्रम्प यांच्यात जोरदार वाद झाला होता. वाद इतका वाढला की मस्क यांनी ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

माझ्या मदतीशिवाय ट्रम्प यांनी निवडणूक जिंकली नसती, असं मस्क यांनी म्हटलं होतं. ट्रम्प यांच्या 'बिग ब्युटीफुल बिल' ला पैशाचा अपव्यय म्हणत इलॉन मस्क सरकारमधून बाहेर पडले होते. मस्क यांच्या टीकेवर सुरुवातीला ट्रम्प यांनी मौन बाळगलं होतं. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार दिला आहे. तसेच जर मस्क यांनी कर कपात विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या रिपब्लिकन उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी डेमोक्रॅटिक उमेदवारांना आर्थिक मदत केली तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ट्रम्प यांनी मुलाखतीमध्ये दिला. "जर त्यांनी असे केले तर त्याला खूप गंभीर परिणाम भोगावे लागतील," असं ट्रम्प म्हणाले.

इलॉन मस्क यांच्यासोबतचे तुमचे संबंध संपल्याचे वाटते का असं विचारले असता, ट्रम्प यांनी, "हो, मलाही तसेच वाटते," असं म्हटलं. लवकरच मस्कशी बोलण्याची माझी कोणतीही योजना नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 'मी इतर गोष्टींमध्ये खूप व्यस्त आहे, माझा त्यांच्याशी बोलण्याचा कोणताही हेतू नाही,' असंही ट्रम्प म्हणाले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिका