शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प भडकले; चीनला दिला 'हा' इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 21:31 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चीननं लावलेल्या नव्या आयातावरील शुल्काच्या नियमावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला सरळ सरळ इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, अमेरिकेतल्या कंपन्या ज्या चीनमध्ये कार्यरत आहेत, त्यांना चीन सोडण्याचं अपील केलं आहे. आम्हाला चीनची गरज नाही. खरं तर त्यांच्याशिवाय आमची चांगली प्रगती होईल. दरम्यान, व्यापारयुद्धामुळे अमेरिकेची प्रगती संथ गतीनं सुरू असून, जागतिक अर्थव्यवस्थाही कमकुवत होत आहे.शेअर बाजारांची स्थितीही फारशी चांगली नाही. ट्रम्प म्हणाले, आमच्या देशाला एवढ्या वर्षांत चीनमुळे खर्व डॉलरचं नुकसान सोसावं लागलं आहे. त्यांनी वर्षभरात अब्जो डॉलरच्या किमतीची आमची बौद्धिक संपदा लुटली आहे. त्यांना हे सुरूच ठेवायचं आहे. परंतु आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही चीनमध्ये कार्यरत असलेल्या अमेरिकी कंपन्यांना तात्काळ तिथून निघून दुसऱ्या देशांचा पर्याय शोधावा, असं सांगितलं आहे. तत्पूर्वी चीननं शुक्रवारी घोषणा केली होती की, अमेरिकेकडून आयात करण्यात येणाऱ्या 75 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर 10 टक्के आयात शुल्क आकारलं जाणार आहे. दुसरीकडे ट्रम्प सरकारनं 15 ऑगस्टला घोषणा केली होती की, अमेरिका 300 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 10 टक्के अतिरिक्त आयात शुल्क आकारणार आहे. त्याच्या उत्तरादाखल चीननं अमेरिकेत तयार करण्यात येणारी वाहनं आणि पार्ट्सवर 25 टक्के किंवा 5 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क 15 डिसेंबरपासून वसूल केलं जाणार आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाchinaचीन