शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

युक्रेनच्या सर्व नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण, डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नवीन करार? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 17:28 IST

अमेरिकेने युक्रेनला आर्थिक मदत केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नवीन करारासाठी दबाव टाकत आहेत.

Russia-Ukraine : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढागार घेतला आहे. पण, यासाठी त्यांना युक्रेनसोबत दुर्मिळ खनिजे आणि महत्त्वाच्या खनिज संपत्तीबाबत करार करायचा आहे. अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीच्या दबावाखाली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी यासाठी होकारही दिला होता, मात्र आता ट्रम्प यांनी युक्रेनकडे एका नवीन कराराची मागणी केली आहे. नवीन करारात ट्रम्प यांना युक्रेनच्या सर्व नैसर्गिक संसाधनांवर जवळजवळ पूर्ण नियंत्रण हवे आहे आणि त्या बदल्यात युक्रेनला कोणतीही सुरक्षा हमीदेखील मिळणार नाही. 

फायनान्शिअल टाईम्समधील एका अहवालानुसार, ट्रम्प यांना युक्रेनमधील सर्व महत्त्वाच्या खनिजांवरच नव्हे, तर तेल आणि वायूसह युक्रेनच्या सर्व ऊर्जा संसाधनांवरही जवळजवळ पूर्ण नियंत्रण हवे आहे. रशियासोबतच्या युद्धात अमेरिकेने युक्रेनला अब्जावधी डॉलर्स दिले आणि या पैशाच्या बदल्यात युक्रेनच्या नैसर्गिक संसाधनांवर ताबा हवा आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीदेखील मान्य केले आहे की, ट्रम्प प्रशासनाने खनिज करारासाठी नवीन प्रस्ताव सादर केला आहे, पण त्यांनी तपशीलांवर भाष्य केले नाही. 

आण्विक प्रकल्पांवरही नियंत्रण हवे व्हाईट हाऊसमध्ये 28 फेब्रुवारी रोजी ट्रम्प आणि झेलेन्स्की महत्त्वाच्या खनिज नियंत्रण करारावर स्वाक्षरी करणार होते, परंतु तसे झाले नाही. झेलेन्स्कींचा ट्रम्प आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्याशी वाद झाला आणि त्यामुळे त्यांना व्हाईट हाऊसमधून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पांवरही नियंत्रण ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, परंतु झेलेन्स्की यांचे म्हणणे आहे की, देशाच्या अणुऊर्जा प्रकल्पांचा कोणत्याही करारात समावेश नाही. आता ट्रम्प यांनी जुन्या कराराचा विस्तार केला आहे. 

अहवालानुसार, ट्रम्प आता युक्रेनच्या सर्व नैसर्गिक संसाधनांवर ताबा मिळवू इच्छितात, ज्यात दुर्मिळ खनिजे, तेल आणि वायू यांचा समावेश आहे. यापूर्वी ज्या करारावर सहमती झाली होती, त्यामध्ये केवळ भविष्यातील प्रकल्पांमधील नफ्याचा समावेश होता, परंतु आता ट्रम्प यांना युक्रेनने त्यांच्या सर्व सरकारी आणि खाजगी प्रकल्पांमधील नफा अमेरिकेला वाटून घ्यावा असे वाटते. अशा प्रकल्पांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची वाटणी करण्यासाठी संयुक्त गुंतवणूक निधी स्थापन करावा, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. या निधीच्या देखरेखीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या पाच सदस्यीय मंडळात अमेरिकेला तीन सदस्यांची नियुक्ती करायची आहे. यामुळे अमेरिकेला आपोआपच निधीच्या कामकाजावर नियंत्रण आणि व्हेटो पॉवर मिळेल.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया