शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

US Election : बायडन जिंकल्यास डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 07:05 IST

ज्यो बायडन हे ट्रम्प यांचा पराभव करतील, असा निष्कर्ष काही जनमत चाचण्यांतून काढण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी स्थिती उद्भवल्यास डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात गेले तर अमेरिकी लोकशाहीच्या दृष्टीने ते आक्रितच घडेल. अमेरिकेत कोरोना साथीने हाहाकार माजविला आहे. (Donald Trump)

ठळक मुद्देज्यो बायडन हे ट्रम्प यांचा पराभव करतील, असा निष्कर्ष काही जनमत चाचण्यांतून काढण्यात आला आहे.अमेरिकेत कोरोना साथीने हाहाकार माजविला आहे.राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलावी यासाठी सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले होते.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन जिंकल्यास त्या निकालाला विद्यमान राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात आव्हान देण्याचीही शक्यता आहे. अशा धक्कादायक घटना तीन नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीनंतर घडू शकतात, असे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.

ज्यो बायडन हे ट्रम्प यांचा पराभव करतील, असा निष्कर्ष काही जनमत चाचण्यांतून काढण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी स्थिती उद्भवल्यास डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात गेले तर अमेरिकी लोकशाहीच्या दृष्टीने ते आक्रितच घडेल. अमेरिकेत कोरोना साथीने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलावी यासाठी सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले होते. कोरोना साथीला फार महत्त्व न देणाऱ्या तसेच विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाºया डोनाल्ड ट्रम्प यांनाच जेव्हा त्या संसर्गाची बाधा झाली त्यावेळी रिपब्लिकन पक्ष हादरला होता. राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या मतदानाचा दिवस अगदी तोंडावर आलेला असताना ट्रम्प यांची प्रचार मोहीम थंडावणे त्या पक्षाला मानवणारे नव्हते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनीही रुग्णालयात काही दिवसच राहून पुन्हा प्रचार मोहिमेत उडी घेतली. ज्यो बायडन यांची जिंकण्याची शक्यता ट्रम्प यांच्यापेक्षा १७ टक्क्यांनी अधिक आहे, असा निष्कर्ष ओपियम रिसर्च व गार्डियनने केलेल्या जनमत चाचणीतून काढण्यात आला होता.मास्क काढून समर्थकांच्या दिशेने भिरकावले - अमेरिकेतील एका प्रचार सभेत डोनाल्ड ट्रम्प यांनी तोंडाला लावलेला मास्क काढून आपल्या समर्थकांच्या दिशेने भिरकावले. कोरोना साथीचे आपल्या मनात भय नाही, असे ट्रम्प यांना सूचित करायचे होते, असे त्यांच्या पाठीराख्यांनी सांगितले. मात्र, ट्रम्प यांच्या या कृतीवर अमेरिकेत टीकेची झोड उठविण्यात आली आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पElectionनिवडणूकJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाUS ElectionAmerica Election