शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकन झेंडा देशात अर्ध्यावर का उतरवला जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 19:39 IST

ट्रम्प यांच्या तक्रारीवर व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या तक्रारीवर भाष्य करण्यास नकार देण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती म्हणून येत्या २० जानेवारीला शपथ घेणार आहेत मात्र याच काळात संपूर्ण देशात अमेरिकन झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. सामान्यत: एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या सन्मानासाठी असं केले जाते परंतु ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकन झेंडे अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. 

ज्यो बायडन प्रशासनाने माजी राष्ट्रपती जिमी कार्टर यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानासाठी देशात एक महिन्याचा दुखवटा लागू केला आहे. राष्ट्रीय दुखवट्यावेळी झेंडा अर्ध्यावर उतरवण्याची परंपरा आहे. मात्र याच कालावधीत ट्रम्प यांचा शपथग्रहण सोहळा पार पडणार आहे. याबाबत ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. ९ जानेवारीला जिमी कार्टर यांच्या अंत्यविधीला ट्रम्प सहभागी होतील परंतु त्यांच्या शपथविधीला पहिल्यांदाच देशातील झेंडे अर्ध्यावर उतरवले जातील. माझ्या शपथविधीला अमेरिकन झेंडे अर्ध्यावर फडकवले जातील यामुळे विरोधी पक्षाला आनंद आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प म्हणाले की, विरोधी पक्षाला वाटतं हे खूप चांगले आहे त्यातून त्यांना आनंद झाला आहे कारण ते आपल्या देशावर प्रेम करत नाहीत ते स्वत:चाच विचार करतात. मागील आठवड्यात कार्टर यांच्या मृत्यूमुळे अमेरिकन झेंडा पहिल्यांदा भावी राष्ट्रपतींच्या शपथविधीला अर्ध्यावर उतरवला जाईल. कुणालाही हे पाहायचे नाही कारण बायडन यांच्या निर्णयाने अमेरिकन लोक नाराज आहेत. पुढे पाहू काय घडते असं ट्रम्प यांनी म्हटलं.

दरम्यान, ट्रम्प यांच्या तक्रारीवर व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या तक्रारीवर भाष्य करण्यास नकार देण्यात आला. माजी राष्ट्रपती जिमी कार्टर यांच्यावर ९ जानेवारीला अंत्यसंस्कार होणार आहेत. दिर्घकाळ अमेरिकेचे राष्ट्रपती पद सांभाळणारे जिमी कार्टर यांच्या सन्मानासाठी दुखवटा पाळला जात आहे.  विद्यमान राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी सर्व संघराज्यात अमेरिकन झेंडा ३० दिवसांसाठी अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश दिले आहेत. याच काळात होणाऱ्या नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यालाही ते हजर राहतील. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका