शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 12:39 IST

ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर नौदल नाकेबंदी लादली आणि त्याचा फायदा झाला. आता ट्रम्प तीच रणनीती इराणवर वापरू शकतात.

वॉशिंग्टन - अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा अयशस्वी ठरली आहे. कुठल्याही ठोस तोडग्याशिवाय अमेरिका आणि इराणी शिष्टमंडळ पाकिस्तानातून रवाना झाले. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे. अमेरिकेने इराणचा सागरी मार्ग रोखल्याचा दावा करण्यात आला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया ट्रूथवर एक न्यूज आर्टिकल शेअर केले आहे. त्यात अमेरिका-इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी ठरल्यास आता ट्रम्प यांच्याकडे इराणी नौदलाला घेराव घालण्याचा पर्याय आहे. ही बातमी चर्चेचा परिणाम समोर येण्यापूर्वीची आहे. त्यात लिहिलंय की, जर इराणने अंतिम प्रस्ताव फेटाळला तर ट्रम्प यांच्याकडे अनेक पर्याय तयार आहेत. ट्रम्प यांनी आधीच इराणला पाताळात पाठवण्याची धमकी दिली आहे. आता ते व्हेनेझुएलासारखे इराणची आर्थिक कोंडी करू शकतात असं सांगण्यात आले आहे.

ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर नौदल नाकेबंदी लादली आणि त्याचा फायदा झाला. आता ट्रम्प तीच रणनीती इराणवर वापरू शकतात. त्यातून इराणच्या तेल महसूलाचा मार्ग बंद होईल. चीन आणि भारतासारख्या देशांवर दबाव वाढेल. विशेष म्हणजे व्हेनेझुएलाच्या नाकेबंदीचे नेतृत्व करणारी युद्धनौका यूएसएस जेराल्ड फोर्ड सध्या पर्शियन आखातात तैनात आहे. दुरुस्तीनंतर ती पुन्हा सक्रीय झाली आहे. त्याशिवाय यूएसएस अब्राहम लिंकनही सोबत आहे. अमेरिकन नौदलला आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर संपूर्ण नियंत्रण मिळवणे सोपे झाले आहे. मागील २४ तासांत १० जहाजांची वाहतूक पाहायला मिळाली. ज्यात एका रशियन टँकरचा समावेश होता असं लेक्सिंग्टन इन्स्टिट्यूटचे सुरक्षा तज्ज्ञ रेबेका ग्रांट यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पुन्हा सुरू झाले तर अमेरिकन सैन्य इराणच्या खार्ग बेटावर कब्जा करू शकते किंवा ते उद्ध्वस्त करू शकते. खार्ग बेट इराणची आर्थिक नाडी आहे. जर खार्ग बेटावर अमेरिकेने कब्जा केला तर तिथल्या तेल आणि इतर गोष्टींवर अमेरिकेची पकड होईल. त्यातून इराणवर दबाव वाढेल आणि त्यांचा समृद्ध यूरेनियमचा साठा जप्त करता येऊ शकतो असं सेवानिवृत्त जनरल जैक किन यांनी म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Furious as Iran Peace Talks Fail; Threatens Naval Blockade

Web Summary : Failed peace talks infuriated Trump, who now threatens Iran with a naval blockade, mirroring the Venezuela strategy. This could cripple Iran's oil revenue, pressuring countries like China and India. The US Navy, including USS Gerald Ford, is positioned to control the Strait of Hormuz. Seizing Kharg Island, Iran's economic lifeline, is also considered.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराण