शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मी लोकशाहीसाठी गोळी झेलली; जो बायडेन देशासाठी धोका! डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 14:38 IST

Donald Trump Firing Incident : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या आठवड्यात जीवघेणा हल्ला झाला होता.

Donald Trump Firing Incident : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या आठवड्यात जीवघेणा हल्ला झाला होता. पेनसिल्व्हेनिया येथे एका निवडणूक रॅलीत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ट्रम्प यांचा जीव वाचला, पण त्यांच्या कानाला गोळी लागली. त्या घटनेच्या सुमारे आठवडाभरानंतर त्यांनी पुन्हा एका रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला. 'मी देशाच्या लोकशाहीसाठी गोळी झेलली अन् जो बायडेन मला लोकशाहीसाठी धोका असल्याचे म्हणतात,' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. 

देवाच्या कृपेने वाचलोमिशिगनमधील रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी वारंवार हत्येच्या प्रयत्नाचा उल्लेख केला. ट्रम्प पुढे म्हणतात, 'देवाच्या कृपेने मी जीवंत आहे, अन्यथा मी आज तुमच्यात उभा नसतो. आठवडाभरापूर्वी माझ्या हत्येचा प्रयत्न झाला, त्या हल्ल्यातून मी थोडक्यात बचावलो, यासाठी देवाचे लाख लाख आभार. मला आशा आहे की, पुन्हा मला त्यातून जावे लागणार नाही. ती घटना खूप भयंकर होती, सुदैवाने गोळी कानाला लागली. गोळी थेट डोक्याला लागली असती, तर आज मी जीवंत नसतो', असेही ट्रम्प म्हणाले. 

आम्ही नवीन युग सुरू करू यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले होते की, 'मी अर्ध्या अमेरिकेचा नाही, तर संपूर्ण अमेरिकेचा अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आहे. अर्धी अमेरिका जिंकून विजय मिळत नाही. आजपासून चार महिन्यांनी आपला मोठा विजय होईल. आम्ही सर्व धर्म, लोक आणि पंथांसाठी शांतता आणि समृद्धीच्या नवीन युगाची सुरुवात करू,' असा दावा ट्रम्प यांनी केला होता.

लोकशाही वाचवण्यासाठी परतणार - बायडेनदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सातत्याने ट्रम्प लोकशाहीसाठी धोका असल्याची टीका करत आहेत. बायडेन म्हणाले की, ट्रम्प यांच्याकडे अमेरिकेच्या चांगल्या भविष्यासाठी दृष्टी नाही. चार वर्षांपूर्वी लोकांनी त्यांना नाकारले होते. आगामी निवडणुकीत आम्ही त्यांचा नक्की पराभव करू,' अशी टीका त्यांनी केली होती. 

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडन