शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांनी USAID च्या २००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; हजारोंना सक्तीच्या रजेवर पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 06:49 IST

आताचे हे कर्मचारी युएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे आहेत. २००० कर्मचाऱ्यांना रातोरात नारळ देण्यात आला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी काही सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, तसेच हजारो कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्याचे आदेश जारी केले आहेत. 

आताचे हे कर्मचारी युएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे आहेत. २००० कर्मचाऱ्यांना रातोरात नारळ देण्यात आला आहे. 

शुक्रवारी एका संघीय न्यायाधीशाने प्रशासनाला USAID कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची परवानगी दिली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्याची कर्मचाऱ्यांची विनंती न्यायाधीश कार्ल निकोल्स यांनी  फेटाळून लावली.

यानंतर लगेचच वेळ न दवडता ट्रम्प यांनी अधिसूचना जारी केली आहे. मिशन-आधारित आवश्यक कार्ये, प्रमुख नेतृत्व आणि विशेषतः नियुक्त केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असलेले कर्मचारी यातून वगळण्यात आले आहेत. यूएसएआयडीचे वॉशिंग्टन मुख्यालय बंद करण्यात आले होते. जागतिक स्तरावर हजारो मदत आणि विकास कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत. 

या मोहिमेद्वारे परदेशात असलेल्या लोकांना आता धक्का बसला आहे. परदेशात तैनात कर्मचाऱ्यांना आपत्कालीन संपर्क सुविधा पुरवल्या जाणार आहेत. टू-वे रेडिओ आणि पॅनिक बटण सुविधा असलेले मोबाइल अॅप उपलब्ध असणार असल्याचे सरकारने कोर्टात सांगितले आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच लाखभर कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांची उपयुक्तता तपासण्यात येणार आहे. यासाठी त्यांची लाय डिटेक्टर चाचणी घेतली जाणार आहे. सरकारच्या गोपनिय फाईल्स लीक होऊ नयेत किंवा केल्या असतील या संशयातून ट्रम्प सरकार या लाखो कर्मचाऱ्यांची लाय डिटेक्टर टेस्ट करणार आहे. अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. सरकारी गोपनिय कागदपत्रे लीक होण्यापासून वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका