शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले 'व्हाइट हाऊस म्हणजे कचरा'

By sagar.sirsat | Updated: August 4, 2017 08:58 IST

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते त्यांच्या अशाच एका विधानामुळे. व्हाइट हाऊस म्हणजे कच-याचा ढिगारा आहे असं ट्रम्प म्हणाल्याचा दावा अमेरिकेच्या मीडियाने केला आहे.

ठळक मुद्देव्हाइट हाऊस म्हणजे कच-याचा ढिगारा आहे असं ट्रम्प म्हणाले असल्याचा अमेरिकेच्या मीडियाचा दावा''मी इकडे वारंवार येतो कारण ,व्हाइट हाऊस म्हणजे कचरा आहे, ही एक गलिच्छ जागा आहे''

वॉशिंग्टन, दि. 4 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते त्यांच्या अशाच एका विधानामुळे. व्हाइट हाऊस म्हणजे कच-याचा ढिगारा आहे असं ट्रम्प यांनी म्हटल्याचा दावा अमेरिकेच्या मीडियाने केला आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा खोडून काढला आहे. 

golf.com ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यू जर्सीच्या बेडमिंस्टर येथे असलेल्या स्वतःच्या एका गोल्फ कोर्स क्लबमध्ये ट्रम्प गेले होते. गोल्फ खेळण्यापूर्वी गोल्फ क्लबच्या सदस्यांसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले,  ''मी इकडे वारंवार येतो कारण ,व्हाइट हाऊस म्हणजे कचरा आहे, ती एक गलिच्छ जागा आहे''.

याबाबतचं वृत्त आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टीकेचं लक्ष्य ठरले आहेत. ट्रम्प राष्ट्रपतीपदाचा सन्मान ठेवत नाहीत त्यांनी राष्ट्रपतिपद सोडावं अशी मागणी अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. 

दुसरीकडे काल ट्रम्प यांनी ट्विट करून यावर स्पष्टीकरण दिलं . माझं व्हाइट हाऊसवर प्रेम आहे. मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात सुंदर इमारतींपैकी ते एक आहे. मी व्हाइट हाऊसला कचरा म्हणाल्याचं वृत्त धाधांत खोटं आहे, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं.

ट्रम्प यांच्या या ट्विटनंतर golf.com ने आणखी एका वृत्तात ट्रम्प खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. 'ते व्हाइट हाऊसला कचरा म्हणाले त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या जवळपास 8 क्लबच्या सदस्यांनी ते ऐकलं' या आशयाखाली  golf.com ने वृत्त प्रकाशीत केलं आहे.