अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन नियमांमध्ये नवीन बदल केले आहेत. यामुळे आता नियम अधिक कडक झाले आहेत. अधिकृत निर्देशानुसार, अमेरिकेत राहण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना लठ्ठपणा किंवा मधुमेहासारख्या आरोग्य समस्या असल्यास त्यांना व्हिसा नाकारला जाऊ शकतो.
जर आजारी लोकांना अमेरिकेत प्रवेश दिला तर ते सार्वजनिक ओझे बनू शकतात आणि ते अमेरिकन संसाधनांचा अपव्यय करू शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दूतावास आणि वाणिज्य दूतावासांना पाठवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
अमेरिकेच्या दूतावासांना आणि वाणिज्य दूतावासांना केबलद्वारे पाठवण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वे परराष्ट्र विभागाने जारी केली आहेत, समस्याग्रस्त व्यक्ती "सार्वजनिक ओझे" बनू शकतात आणि संभाव्यतः अमेरिकन संसाधनांचा अपव्यय करू शकतात.
आरोग्य मूल्यांकन हे वर्षानुवर्षे व्हिसा प्रक्रियेचा एक भाग
संभाव्य स्थलांतरितांचे आरोग्य मूल्यांकन हे व्हिसा अर्ज प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे, यामध्ये क्षयरोग (टीबी) आणि तत्सम संसर्गजन्य रोगांसाठी तपासणी आणि लसीकरण तसेच मानसिक आरोग्य माहिती समावेश आहे. पण नवीन मार्गदर्शक तत्त्वे त्यांची व्याप्ती वाढवतात. नवीन मार्गदर्शक तत्त्वे व्हिसा अधिकाऱ्यांना अर्जदाराच्या आरोग्य स्थितीनुसार त्यांचा अर्ज नाकारण्याचा किंवा मंजूर करण्याचा अधिकार देतात.
या आजारांचा समावेश
"तुम्ही अर्जदाराच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे. काही वैद्यकीय परिस्थिती विशेष लक्ष देण्यास पात्र आहेत, यात लठ्ठपणा, हृदयरोग, श्वसन रोग, कर्करोग, मधुमेह, चयापचय विकार, न्यूरोलॉजिकल रोग आणि मानसिक आजार यांचा समावेश आहे." यामध्ये असेही म्हटले आहे.
Web Summary : Under Trump's new immigration rules, visa applicants with obesity or diabetes may be denied entry to the US. The US government believes that allowing unhealthy people into the country could burden public resources.
Web Summary : ट्रम्प के नए आव्रजन नियमों के तहत, मोटापा या मधुमेह वाले वीजा आवेदकों को अमेरिका में प्रवेश से वंचित किया जा सकता है। अमेरिकी सरकार का मानना है कि अस्वस्थ लोगों को देश में आने की अनुमति देने से सार्वजनिक संसाधनों पर बोझ पड़ सकता है।