शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

चिलीत कोरोनाबाधितांना कुत्र्यावरील लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 04:39 IST

दोन पशुचिकित्सकांना १९,५०० डॉलरचा ठोठावला दंड

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईत सामान्य माणसांपर्यंत लस पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे; परंतु काही लोकांना कोरोनावरील लसीऐवजी कुत्र्याची लस दिली गेली, असे जर सांगितले तर? अर्थात, ही घटना चिली देशातील असून, तेथे एका डॉक्टरने असेच काही करूनठेवले.उत्तर चिलीत आरोग्य अधिकाऱ्यांनी दोन पशुचिकित्सकांना दंड ठोठावला. त्यांच्यावर आरोप आहे की, कोविड- १९ पासून सुरक्षित राखण्याच्या नावावर ते लोकांना कॅनाईन लस देत होते. एंटोफगास्टा प्रांताचे उप आरोग्य सचिव रोक्साना डिआज यांनी म्हटले की, ‘आमच्या संस्थेचा कार्यकर्ता माहिती मिळाल्यावर कलमा शहरात मारिया फर्नांडा मुनोजच्या पशुचिकित्सा क्लीनिकमध्ये गेला. तेथे लोकांनी मास्क घातलेला नव्हता आणि त्यांनी सांगितले की, आम्हाला लस दिली गेली आहे. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे नाही. हे लोक ज्या लसीबद्दल बोलत होते ती कुत्र्यांची होती.याआधी मुनोजने म्हटले होते की, ‘आम्ही कुत्र्यांतील कोरोना विषाणूची लस स्वत: घेतली आणि आमच्या कर्मचाऱ्यांनाही दिली.’ या लसीमुळे आम्ही अगदी व्यवस्थित आहोत, असा दावाही त्यांनी केला.रोक्साना डिआजने म्हटले की, वस्तुस्थिती ही आहे की, ही लस फारच धोकादायक आहे. मुनोजशिवाय दुसरा एक पशुचिकित्सक कारलोस पारडोदेखील या लसीचा प्रचार करीत होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर आरोग्य विभागाने पारडोला ९,२०० आणि मुनोजला १०,३०० डॉलरचा दंड ठोठावला.

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाn    सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  त्यापैकी एका न्यायाधीशाची प्रकृती खालावली असून, त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारही न्यायाधीश सोमवारपर्यंत नियमित सुनावणी घेत होते. n    या न्यायाधीशांसोबतच न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. विविध न्यायाधीशांच्या हाताखाली असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे दैनंदिन  कामात अडचणी निर्माण होत आहेत. ही परिस्थिती  पाहता न्यायालयात केवळ तातडीच्या प्रकरणांचीच सुनावणी होणार आहे. 

n    याशिवाय आणखी १५ जणांची नावे कोरोना तपासणीसाठी पाठवली आहेत. काही दिवसांनी नवे सरन्यायाधीश एन. व्ही.  रमणा यांचा नव्या सरन्यायाधीशांचा शपथविधी होणार आहे. n    कोरोना चाचणी निगेटिव्ह असलेल्या न्यायाधीशांनाच या शपथविधीला उपस्थित राहता येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या