शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कमकुवत समजू नका, पाकच्या नवनियुक्त परराष्ट्रमंत्र्यांचा भारताला अप्रत्यक्ष इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 13:14 IST

पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पदभार संभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांवर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या हिताला धक्का पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारस्थान रचले जात आहे. पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी पावले उचलली त्याला या दोन्ही देशांनी अजिबात सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

लाहोर, दि. 7 - पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी पदभार संभाळल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तान या देशांवर गंभीर आरोप केले आहेत.  इंडस वॉटर ट्रीटी म्हणजेच सिंधू पाणी वाटप करारातंर्गत पाकिस्तानच्या हिताला धक्का पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारस्थान रचले जात असून त्यात भारत आणि अमेरिका सहभागी आहेत असा गंभीर आरोप ख्वाजा असिफ यांनी केला आहे. 

अफगाणिस्तानात पाकिस्तान विरोधात कट रचले जात असून, त्याला भारताची साथ आहे. पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी पावले उचलली त्याला या दोन्ही देशांनी अजिबात सकारात्मक प्रतिसाद दिला नाही असा उलटा आरोप ख्वाजा असिफ यांनी केला. पाकिस्तानला शांतता आणि शेजारी देशांबरोबर चांगले संबंध हवे आहेत पण कोणी याला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये अशा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी भारताला दिला. 

सिंधू पाणी वाटप करारासंबंधीच्या कटात भारत आणि अमेरिका कशा प्रकारे सहभागी आहेत ते ख्वाजा असिफ यांनी सांगितले नाही. करारातील जे नियम आहेत त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला अंधारात ठेवले असे असिफ यांचे म्हणणे आहे.

काय आहे करार– भारत- पाकमध्ये वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनुसार 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीमध्ये इंडस वॉटर ट्रीटी अर्थात सिंधू पाणी वाटप करार झाला होता.– या करारावर भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल अयूब खान यांच्या स्वाक्षरी आहेत.– करारानुसार, भारत पाकिस्तानला सिंधु, झेलम, चिनाब, सतलज, व्यास आणि रावी नदीचे पाणी देतो.– या नद्यांचे 80 टक्क्यांहून जास्त पाणी हे पाकिस्तानला मिळते. 

पाकिस्तानवर होईल परिणाम…– भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केल्यास पाण्यावाचून शेती आणि अन्नधान्य उत्पादनावरही विपरीत परिणाम झाल्यावर पाकिस्तान ताळ्यावर येईल.– कारण, शेती ही पावसाच्या पाण्यावर नव्हे, तर नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे.– यामुळेच तर पाकिस्तानचा भारताच्या बगलियार आणि किशनगंगा पॉवर प्रोजेक्ट्सला विरोध करत आहे. यासाठी भारतावर आंतराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.– भारताचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स तयार झाल्यास पा‍‍किस्तानच्या तोंडचे पाणी पळेल.