शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला कमी लेखण्याची चूक करु नका, चीनचा पुन्हा भारताला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 17:03 IST

सरकारी मालकीच्या वर्तमानपत्रांमधून भारताला सातत्याने धमकी देणा-या चीनने पुन्हा एकदा पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या माध्यमातून भारताला इशारा दिला आहे.

ठळक मुद्देभारताची ही कृती पूर्णपणे बेकायदा आहे असा आरोप करण्यात आला आहे. चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही किंवा मर्यादीत स्वरुपाच्या लढाईचे पाऊल सुद्धा उचलणार नाही

बिजींग, दि. 7 - सरकारी मालकीच्या वर्तमानपत्रांमधून भारताला सातत्याने धमकी देणा-या चीनने पुन्हा एकदा पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या माध्यमातून भारताला इशारा दिला आहे. प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याचा आमचा जो संकल्प आहे त्याला भारताने कमी लेखू नये असे पीपल्स डेलीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. 

सिक्कीममध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याने भारत-चीन सीमारेषेचे उल्लंघन करुन चीनच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. भारताची ही कृती पूर्णपणे बेकायदा आहे असा आरोप करण्यात आला आहे. चीनचे कायदेशीर अधिकार आणि हित लक्षात घेऊन सर्व आवश्यक उपायोजना करु असे पीपल्ड डेलीच्या वृत्तात म्हटले आहे. सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये निर्माण झालेल्या संघर्षावरुन चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात असली तरी, चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही किंवा मर्यादीत स्वरुपाच्या लढाईचे पाऊल सुद्धा उचलणार नाही असा विश्वास भारतीय सुरक्षा यंत्रणांना  आहे. 

भूतानच्या हद्दीतील डोकलाममधून भारत आणि चीनने सैन्य मागे घेणे हाच दोन्ही देशांसाठी उत्तम पर्याय आहे असे सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी सांगितले. सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळ चीनच्या रस्ता बांधणीच्या हट्टामुळे हा संपूर्ण संघर्ष निर्माण झाला आहे. चीनने उद्या अशी कोणती आगळीक केलीच किंवा युद्धाची परिस्थिती उदभवली तर भारतीय लष्कर उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे असे भारतीय सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितले. 

गेल्या 50 दिवसांपासून हा संघर्ष सुरु असून युद्धा हा या समस्येवर उपाय नाही हे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. व्दिपक्षीय चर्चा, संयमाने तणाव कमी होऊ शकतो असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मागच्या आठवडयात संसदेत सांगितले आहे.  भारत, चीन आणि भूतानच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात, त्या ट्राय जंक्शनच्या भूभागातील परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. भारत-चीन संघर्षात अनेक देशांचा भारताला पाठिंबा आहे. पण एकाही देशाचा भारताला पाठिंबा नाही असे चीनचे म्हणणे आहे.