शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा...; अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 06:48 IST

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील सहा ते आठ आठवड्यांचे अंतर मोदी सरकारने बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढविले. त्यासंदर्भातील प्रश्नावर फौसी म्हणाले की, फायझर व मॉडर्ना कंपनीच्या लसींमधील दोन डोसमध्ये अनुक्रमे तीन आठवडे व चार आठवडे असे अंतर आहे. 

वॉशिंग्टन : कोरोना लसीच्या दोन डोसमधील कालावधी वाढविल्याने लोकांना या विषाणूच्या नव्या प्रकारांचा संसर्ग होण्याचा धोका आहे, असे अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे.कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील सहा ते आठ आठवड्यांचे अंतर मोदी सरकारने बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढविले. त्यासंदर्भातील प्रश्नावर फौसी म्हणाले की, फायझर व मॉडर्ना कंपनीच्या लसींमधील दोन डोसमध्ये अनुक्रमे तीन आठवडे व चार आठवडे असे अंतर आहे. हा कालावधी वाढविल्यास कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांचा संसर्ग आणखी फैलावू शकतो. ब्रिटनध्येही हे दिसून आले आहे. मात्र, कोरोना लसींचा तुटवडा असल्यास दोन डोसमधील कालावधी वाढविण्यास हरकत नाही, असेही फौसी म्हणाले.भारताने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोना लसीच्या दोन डोसमधील कालावधी दोनदा वाढविला. मार्चमध्ये कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांवरून सहा ते आठ आठवडे करण्यात आले. त्यानंतर हे अंतर १२ ते १६ आठवडे झाले. कालावधीतील वृद्धीमुळे लसीची परिणामकारकता वाढते, असे केंद्र सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आले होते.(वृत्तसंस्था)

डेल्टा विषाणू अधिक घातकडेल्टा विषाणू भारतामध्ये गेल्या वर्षी आढळला होता. त्यामुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगण्यात येते. अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले की, डेल्टा विषाणूची संसर्गशक्ती पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा ४० ते ५० टक्क्यांनी अधिक आहे.

n    पुरेशा प्रमाणात लसीकरण न झालेल्या देशाला तर या विषाणूमुळे अधिक हानी होऊ शकते. लस न घेतलेल्या लोकांमध्ये डेल्टाची बाधा झाली की, त्याचा प्रसार झपाट्याने होतो.nकोरोनावर मात करण्यासाठी शक्य तितक्या लवकर लस देणे हाच प्रभावी उपाय आहे, असे फौसी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस