शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन पासपोर्टचे असे करा नूतनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 06:58 IST

भारतात असलेल्या अमेरिकी नागरिकांना त्यांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अमेरिकेतून येऊन अर्ज करण्याची गरज नाही.

प्रश्न : माझ्या अमेरिकी पासपोर्टची मुदत लवकरच संपत आहे. माझ्या पासपोर्टचे भारतातून नूतनीकरण कसे करता येईल?उत्तर : भारतात असलेल्या अमेरिकी नागरिकांना त्यांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अमेरिकेतून येऊन अर्ज करण्याची गरज नाही. भारतातील अमेरिकी लोकांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी यू.एस. काउन्सलेटने हैदराबाद येथील पासपोर्ट प्रक्रिया केंद्र याच कामासाठी आता निश्चित केले आहे. जर तुमचा अलीकडचा पासपोर्ट तुमचे वय किमान १६ वर्षे (वय १५ पेक्षा कमी नसावे) असताना जारी झालेला असेल आणि तुमच्या अलीकडच्या पासपोर्टची वैधतादेखील दहा वर्षांची असेल, तर तुम्ही मेलद्वारे अर्ज करण्यासाठी पात्र आहात. ज्यांना पासपोर्टचे नूतनीकरण करायचे आहे आणि ज्यांनी नमूद निकष पूर्ण केलेले आहेत त्यांनी आपला नूतनीकरणाचा अर्ज यू.एस. कौन्सुलेटच्या हैदराबाद कार्यालयाकडे पाठवावा.

जर तुम्ही प्रौढ असाल आणि तुमच्याकडे कधीही अमेरिकेचा पासपोर्ट नसेल किंवा १८ वर्षांखालील बालक असले तर त्यांनी यू.एस. काउन्सलेटच्या मुंबई येथील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या अमेरिकी नागरिकांना पासपोर्टचे नूतनीकरण करायचे आहे, त्यांनी नूतनीकरण करणारे शुल्क Pay.gov या वेबसाइटवर अमेरिकी डॉलर या चलनात करावे. 

नूतनीकरणाच्या अर्जाचे शुल्क भरण्यासाठी अर्जदार क्रेडिट कार्डाचादेखील वापर करू शकतात. (पासपोर्ट पुस्तिका शुल्क : १३० अमेरिकी डॉलर). अर्जाचे शुल्क भरल्यानंतर, अर्ज पाठविण्यासाठी कोणत्याही स्थानिक कुरिअर सेवेने तो पाठवता येईल. यासोबत अलीकडचा पासपोर्टदेखील हैदराबाद येथील यू.एस. काउन्सलेटकडे पाठवावा लागेल. यू.एस. काउन्सलेटच्या हैदराबाद कार्यालयात मेलद्वारे नूतनीकरणासाठी पाठविण्यात येणाऱ्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. अर्जदाराने जो पत्ता नमूद केला असेल त्या पत्त्यावर पासपोर्ट कुरिअरद्वारे पाठवला जातो. 

  • आपल्या प्रवासाच्या तारखांचा विचार करून आणि आमच्या वेबसाइटवरील सूचना समजून घेऊन अमेरिकी नागरिकांनी आपला पासपोर्ट नूतनीकरणासाठी नियोजनबद्ध वेळेत पाठवावा. 
  • तत्काळ प्रवासासाठी पासपोर्टचे तत्काळ नूतनीकरण हवे असलेल्या लोकांनी आमच्या वेबसाइटवर ‘पात्रता’ या सेक्शनमध्ये जाऊन माहिती घ्यावी.
  • पासपोर्ट नूतनीकरणाच्या प्रश्नांसंदर्भात HydPPT@state.gov येथे संपर्क करावा. अधिक माहितीसाठी https://in.usembassy.gov/u-s-citizen-services/passports. येथे भेट द्यावी.
टॅग्स :Americaअमेरिकाpassportपासपोर्ट