शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Crusader Sword : समुद्रात सापडली 900 वर्षे जुनी तलवार; पाहा व्हिडीओत अप्रतिम दृश्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:38 IST

Crusader Sword : श्लोमी काटझिन यांनी ही तलवार समुद्रातून बाहेर काढली. त्यानंतर ही तलवार इस्रायल पुरातन प्राधिकरणाकडे (IIA) दिली.

इस्रायलमध्ये (Israel) खोल समुद्रात 900 वर्ष जुनी तलवार (Sword)सापडली आहे. एका स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीने ही प्राचीन तलवार शोधली आहे. दरम्यान, ही ऐतिहासिक तलवार धर्मयुद्धावेळी (Crusades) लढणाऱ्या एखाद्या सैनिकाची असेल आणि काही कारणास्तव ही तलवार समुद्रात पडली असावी, असे म्हटले जात आहे. (Israeli diver finds 900 year old sword, said to be Crusader knight's weapon, on Mediterranean seabed)

'मिरर यूके' च्या रिपोर्टनुसार, श्लोमी काटझिन  (Shlomi Katzin) नावाची व्यक्ती समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग करत होती. त्यावेळी जवळपास 200 मीटर खोल समुद्रात गेल्यानंतर एक विचित्र वस्तू दिसली. त्यानंतर श्लोमी काटझिन यांनी जवळ जाऊन पाहिले, तेव्हा त्यांना समजले की, ती तलवार (Crusader Sword) आहे. तलवार खूप जुनी होती. त्यावर अनेक गोष्टींचे अवशेष होते. 

श्लोमी काटझिन यांनी ही तलवार समुद्रातून बाहेर काढली. त्यानंतर ही तलवार इस्रायल पुरातन प्राधिकरणाकडे (IIA) दिली. यावेळी त्यांना सांगण्यात आले की, ही तलवार एका क्रुसेडरची (Crusader) होती आणि ती सुमारे 900 वर्षे जुनी आहे. तर  इस्रायल पुरातन प्राधिकरणाचे रॉबरी प्रिव्हेंशन युनिट इंस्पेक्टर निर डिस्टेलफेल्ड (Nir Distelfeld) म्हणाले की, "या तलवारीचे योग्य त्या स्थितीत जतन करण्यात आले आहे. एक सुंदर आणि दुर्मिळ शोध आहे आणि वरवर पाहता ती क्रुसेडर नाइटची होती." 

दरम्यान, पुरातत्त्व अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तलवारीचे एक मीटर लांब ब्लेड आणि 30 सेमी हँडल आहे. पुरातत्त्व अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ही तलवार एका योद्ध्याची आहे, जो धार्मिक युद्धादरम्यान (Religious War)  लढला होता. त्यावेळी अशा योद्ध्यांना क्रुसेडर  म्हटले जात होते. आता ही तलवार साफ करून अभ्यास केला जाईल.

टॅग्स :Israelइस्रायल