शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:22 IST

PM Modi reaction on Joe Biden Cancer: ८२ वर्षांच्या जो बायडेन यांना स्टेज ४ चा कॅन्सर झाला आहे

PM Modi reaction on Joe Biden Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या संदर्भात त्यांच्या कार्यालयातून एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आले. जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाली असून, हा आजार त्यांच्या शरीरात वेगाने पसरत आहे. चिंताजनक बाब म्हणजे हा कर्करोग त्यांच्या हाडांपर्यंत पोहोचला आहे. सध्या त्यांना स्टेज ४ चा कॅन्सर आहे. जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या आजारपणाच्या वृत्ताने समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे ८२ वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लघवीचा त्रास होता. यासाठी त्यांनी शुक्रवारी डॉक्टरांचा सल्ला घेतला. जेव्हा डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी बायडेन यांच्या आजाराबद्दल कळल्यावर ट्विट केले आहे. "जो बायडेन यांच्या प्रकृतीबद्दल ऐकून खूप काळजी वाटली. त्यांनी लवकर आणि पूर्ण बरे व्हावे माझ्या सदिच्छा. या संघर्षाच्या काळात आम्ही सर्वजण डॉ. जिल बायडेन आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत," असे मोदींनी ट्विट केले.

जो बायडेन यांना कर्करोगाची लक्षणे दिसल्यानंतर त्यांनी तपासणी करून घेतली. त्यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, जो बायडेन आणि त्यांचे कुटुंब डॉक्टरांशी उपचार पर्यायांवर चर्चा करत आहेत. बायडेन यांना झालेला हा आजार अधिक आक्रमक आहे. त्यामुळे त्यावर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक आहे.

काय आहे प्रोटेस्ट कॅन्सर?

जो बायडेन यांना झालेला कर्करोग खूप धोकादायक आहे. प्रोटेस्ट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणारा एक गंभीर आजार आहे. प्रोस्टेट ग्रंथीमध्ये याची सुरुवात होते. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि गुदाशयासमोर स्थित असते, जी वीर्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.​​​​​ जो बायडेन यांचा कर्करोग अतिशय आक्रमक आहे, म्हणून तो हाडांमध्ये पसरला आहे. प्रोस्टेट कर्करोग हळूहळू वाढू शकतो, परंतु काही प्रकरणांमध्ये तो आक्रमक होऊ शकतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये, हाडे किंवा लिम्फ नोड्समध्ये पसरण्याची शक्यता असते.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीcancerकर्करोग