शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

समुद्रात 36,000 फूट खोल जाऊन त्यानं विक्रम रचला; तळाशी सापडल्या प्लास्टिक पिशव्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 5:05 PM

पॅसिफिक महासागरात खोल उडी घेत विक्रमाची नोंद

न्यूयॉर्क: अमेरिकेतील एका व्यक्तीनं समुद्राच्या पोटात जवळपास 36 हजार फूट खोल उडी घेतली आहे. ही जगातली सर्वात खोल उडी असल्याचा दावा त्यांनी आणि त्यांच्यी टीमनं केला. व्हिक्टर वेस्कोवो असं समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पॅसिफिक महासागरात त्यांनी उडी घेतली. यात त्यांना समुद्राच्या तळाशी प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. व्हिक्टर वेस्कोवो यांनी पॅसिफिक महासागराच्या दक्षिण टोकाला असलेल्या चॅलेंजर डीप भागातला समुद्राचा तळ गाठला. सर्वात खोल उडीचा विक्रम करण्यासाठी त्यांनी या भागाची निवड केली. व्हिक्टर यांनी समुद्राचा तळ गाठताना 10 हजार 927 मीटर (35 हजार 853 फूट) अंतर कापलं. यासाठी त्यांना चार तासांचा अवधी लागला. एकट्या व्यक्तीनं समुद्रात मारलेली ही सर्वात खोली उडी असल्याचा दावा त्यांच्या टीमनं केला. याआधी हा विक्रम टायटॅनिकचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांच्या नावावर होता, अशी माहिती व्हिक्टर यांच्या टीमनं दिली. पृथ्वीच्या जन्माबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकणाऱ्या चार प्रजाती यावेळी व्हिक्टर यांना आढळून आल्या. त्यांना समुद्राच्या तळाशी प्लास्टिकच्या पिशव्या आणि चॉकलेटचे रॅपर्सदेखील आढळून आले. माणसाच्या क्षमतेच्या मर्यादा किती विस्तारल्या जाऊ शकतात यासाठी समुद्रात खोल उडी मारण्याचा निर्णय घेतल्याचं व्हिक्टर यांनी सांगितलं. यंदाच्या ऑगस्टमध्ये आर्टिक समुद्रातल्या मॉलोय डीपमध्ये उडी घेऊन समुद्राच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.