नवी दिल्ली : आपल्या सूर्यमालेत फक्त ४० प्रकाशवर्षे दूर असलेल्या पृथ्वीसारख्या सात नव्या ग्रहांचा शोध लागल्याचे बुधवारी ‘नासा’ने जाहीर केल्यानंतर गुगलने दुसऱ्या दिवशी याचा आनंद साजरा करण्यासाठी डुडल त्याला समर्पित केले. या नव्या ग्रहांवर द्रवरूपात पाणी असू शकते व एइल्यन लाइफही (पृथ्वीपासून जे अस्तित्वात आलेले नाहीत असे). हे डुडल रंगीत असून ते अमेरिकेचे कलाकार नेट स्वाईनहार्ट यांनी तयार केले आहे. त्यात पृथ्वी दुर्बिणीतून निरीक्षण करते. त्या वेळी छोट्या ताऱ्याच्या शेजारी असलेला ग्रह मध्येच येतो. नंतरचे त्याचे सहा सहकारी ग्रह लगेचच दुर्बिणीच्या टप्प्यात उडी मारून येतात. पृथ्वी आणि चंद्र नंतर अतिशय उत्साहाने ही घटना साजरी करताना दिसतात.‘‘नासाने आश्चर्यकारक ट्रपिस्ट १ ची घोषणा केल्यानंतर आमच्या नव्या शेजाऱ्यांचे स्वागत गुगल डुडलद्वारे करायला मला मदत झाली (स्वागतास माझ्यासारखी पृथ्वीदेखील खूपच आतूर झाली होती), असे स्वाइनहार्ट यांनी टिष्ट्वटरद्वारे म्हटले होते.
सात नव्या ग्रहांच्या शोधाच्या स्वागतास गुगलडुडल समर्पित
By admin | Updated: February 24, 2017 01:49 IST