हाँगकाँग : चीन आपल्या निर्णयापासून माघार घेण्याची शक्यता दिसत नाही, असे सांगत हाँगकाँगचे मुख्य प्रशासक लेंग चून यिंग यांनी पदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. माझ्या राजीनाम्याने समस्या सुटणार नाही, असे ते म्हणाले.२०१७ मध्ये होणाऱ्या हाँगकाँगच्या मुख्य प्रशासकपदाच्या निवडणुकीचे उमेदवार चीन ठरविणार आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी लोकशाही समर्थकांची मागणी आहे. लोकशाही समर्थकांनी निदर्शने आंदोलन छेडले असून त्याची व्याप्तीही वाढविली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हाँगकाँगमधील महत्त्वाच्या ठिकाणी ते ठिय्या देऊन आहेत.
राजीनामा न देण्याचा लेंग यांचा निर्णय
By admin | Updated: October 13, 2014 03:05 IST