शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषणाने दरवर्षी लाखोंचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2016 03:29 IST

वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ५५ लाख लोक मरतात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त बळी वेगाने आर्थिक विकास करणाऱ्या भारत आणि चीनमधील आहेत, अशी माहिती एका

वॉशिंग्टन : वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात ५५ लाख लोक मरतात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त बळी वेगाने आर्थिक विकास करणाऱ्या भारत आणि चीनमधील आहेत, अशी माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे.सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या भारत आणि चीन या देशातील वायू सर्वात जास्त प्रदूषित आहे. चीनमध्ये कोळसा जाळण्यात आल्याने त्यातून निघणाऱ्या कणामुळे जास्त प्रदूषण होते. या देशात वायू प्रदूषणाने दरवर्षी ३,६०,००० मृत्यू होतात. भारत, चीन, अमेरिका आणि कॅनडा येथील वैज्ञानिकांनी अमेरिकन असोसिएशन फॉर दी अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ सायन्समध्ये (एएएएस) आपले संशोधन सादर केले. त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांमुळे भारतात १४ लाख तर चीनमध्ये १६ लाख लोकांचा मृत्यू झाला.युनिव्हर्सिटी आॅफ ब्रिटीश कोलंबियाचे संशोधक मायकेल ब्राऊर म्हणाले की, जगभरात वायू प्रदूषण हे मृत्यूचे चौथे मोठे कारण आहे. पर्यावरणाकडून निर्माण झालेला धोका हे आजारपणासाठी कारणीभूत आहेत. केवळ उच्च रक्तदाब, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी आणि धूम्रपान यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मात्र वायू प्रदूषणाच्या तुलनेत जास्त आहे. पत्रकार परिषदेत नवीन संशोधनाची माहिती देताना ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या ‘सुरक्षित स्तरा’पेक्षा जगात घनदाट ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या भागात जास्त वायू प्रदूषण आहे. (वृत्तसंस्था)या संशोधनात १९९० ते २०१३ दरम्यान १८८ देशात आरोग्य आणि वायू प्रदूषणसारख्या धोकादायक कारणांचे विश्लेषण करण्यात आले. ब्राऊर म्हणाले की, आशियात मोठी लोकसंख्या असणारे देश असून येथेच जास्त प्रदूषण आहे. भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानातील परिस्थिती पाहता या देशात वायू प्रदूषण उत्तरोत्तर वाढत आहे. चीनमधील परिस्थिती स्थिर असली तरीही तेथील वायू प्रदूषण प्रचंड आहे. त्याचबरोबर या देशातील लोक वृद्ध होत चालले आहेत. लोकांचे वय वाढत चालले आहे. प्रदूषणामुये या देशात हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, कर्करोगासारख्या गंभीर आजाराची व्याप्ती वाढत आहे.