शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रायलमध्ये क्रिकेट सामन्यात अम्पायरचा मृत्यू

By admin | Updated: November 30, 2014 12:56 IST

ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूजचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इस्त्रायलमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने अम्पायरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

अशदोद (इस्त्रायल) दि. ३० - उसळता चेंडू डोक्याला लागल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूजचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इस्त्रायलमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने अम्पायरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
इस्त्रायलमधील अशदोद येथे सध्या साखळी सामने सुरु असून या सामन्यात हिलेल अवास्केर (वय ५८) हे अम्पायर होते. अवास्केर बॉलिंग एंडला उभे होते. या दरम्यान एका वेगवान चेंडूवर फलंदाजाने  फटका मारला. मात्र हा चेंडू सरळ जाऊन स्टम्पवर लागला व तिथून उडून तो जोरात अवास्केर यांच्या छातीवर लागला. यामुळे अवास्केर मैदानातच कोसळले व त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीवर चेंडू लागल्यावर अवास्केर यांना ह्रदयविकाराचा झटका आला व यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती अवास्केर यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिली. 
अवास्केर हे इस्त्रायलच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इस्त्रायल संघ त्यांच्याच नेतृत्वाखाली खेळला होता. इस्त्रायलमधील स्थानिक स्पर्धांमध्ये सर्वाधिक २४४ धावा करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर होता.