शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 11:41 IST

​​​​​​​Israeli Airstrikes in Lebanon : ही आकडेवारी 8 ऑक्टोबर 2023 पासून आत्तापर्यंतची आहे. यासंदर्भात लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. 

Israeli Airstrikes in Lebanon : इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेच्या अनेक बड्या नेत्यांचा खात्मा केला. इस्रायलकडून हिजबुल्लाहवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमुळे लेबनॉनमधील आतापर्यंत 2,367 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 11,088 लोक जखमी झाले आहेत. ही आकडेवारी 8 ऑक्टोबर 2023 पासून आत्तापर्यंतची आहे. यासंदर्भात लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. 

गुरुवारी मंत्रालयाने सांगितले की, 15 ऑक्टोबर रोजी लेबनॉनच्या विविध भागात इस्रायली हवाई हल्ल्यात मृतांची संख्या 17 झाली आहे आणि जखमींची संख्या 182 झाली आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण भागात तीन जणांचा मृत्यू झाला असून 92 जण जखमी झाले आहेत. नाबातियेह प्रांतात नऊ जण ठार तर 49 जखमी झाले. त्याचवेळी बेका खोऱ्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. याव्यतिरिक्त, बालबेक हरमेल प्रांतात 15 लोक जखमी झाले आहेत.

गेल्या महिन्यापासून म्हणजेच 23 सप्टेंबरपासून, इस्त्रायली सैन्य हिजबुल्लाहसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान लेबनॉनवर वेगाने हवाई हल्ले करत आहे. 8 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायली सैन्य लेबनीज-इस्रायल सीमेवर गोळीबार करत आहे. तसेच, दुसरीकडे गाझा पट्टीत हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. गेल्या वर्षी इस्रायलने हमासवर केलेल्या हल्ल्यानंतर या हवाई मोहिमा वाढल्या आहेत. गाझा पट्टीवर इस्रायलच्या हल्ल्यात 42,400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

मध्यपूर्वेत तणावाची परिस्थितीजगातील अनेक मोठे देश आणि संघटनांनी मध्यपूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीबाबत अनेक इशारे दिले आहेत. सर्व प्रयत्न करूनही शांतता चर्चा होऊ शकली नाही. दरम्यान, गाझा आणि लेबनॉनवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच होते. इस्रायलने 1 ऑक्टोबर रोजी दक्षिण लेबनॉनमध्ये प्रवेश करून जमिनीवर कारवाई सुरू केली, तेव्हा परिस्थितीने गंभीर वळण घेतले. त्यामुळे मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षInternationalआंतरराष्ट्रीय