भारत आणि २७ देशांचा समूह असलेल्या युरोपियन युनियन (EU) मध्ये प्रदीर्घ चर्चेनंतर, आज ऐतिहासिक व्यापार करार झाला. या कराराला 'मदर ऑफ ऑल डील्स' म्हटले जात आहे. युरोपियन युनियन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, तर युरोपसाठी अमेरिका हा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री करून, अमेरिकेतील बाजारात मोठ्या प्रमणावर पैसा वळवला आहे.
अमेरिकन शेअर्समध्ये १०.४ ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक महत्वाचे म्हणजे, युरोपियन गुंतवणूकदारांनी अमेरिकन शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक १०.४ ट्रिलियन डॉलर या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. तर गेल्या तीन वर्षांत त्यांची मालकी ४.९ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे, म्हणजेच ९१ टक्क्यांची वाढली आहे. डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन आणि ब्रिटन या देशांच्या गुंतवणूकदारांची यूएस इक्विटीमधील भागीदारी ५.७ ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ५५ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे, अमेरिकन शेअर्समधील एकूण परदेशी गुंतवणुकीत एकट्या युरोपचा वाटा ४९ टक्के इतका मोठा आहे.
युरोपचा अमेरिकन शेअर्समधील 'एक्स्पोजर' आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर -खरे तर, ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि युरोपमध्ये मोठे मतभेत आहेत. मात्र असे असेल तरी, दोघांची आर्थिक जवळीक दिसून येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा केल्याने डेन्मार्क आणि नाटो (NATO) देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, अमेरिकेशिवाय युरोप स्वतःचे संरक्षण करू शकत नाही आणि दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे, असे नाटो प्रमुखांनी म्हटले आहे. या राजकीय तणावाच्या सावटाखाली युरोपचा अमेरिकन शेअर्समधील 'एक्स्पोजर' आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
Web Summary : India and EU struck a trade deal. Despite tensions, European investment in US shares hits a record $10.4 trillion, highlighting strong economic ties.
Web Summary : भारत और यूरोपीय संघ में व्यापार समझौता हुआ। तनाव के बावजूद, अमेरिकी शेयरों में यूरोपीय निवेश 10.4 ट्रिलियन डॉलर के रिकॉर्ड स्तर पर, मजबूत आर्थिक संबंधों को उजागर करता है।