इस्लामाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला भेट देऊन प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने पाकिस्तानचा जळफळाट होत आहे. भारत व अमेरिका यांच्यातील अणुउर्जा करार, अमेरिकेने भारताला सुरक्षा परिषदेत कायमच्या सदस्यत्वाला दिलेला पाठिंबा प्रत्येक बाबीवर पाकिस्तान कटकट करत आहे. भारत व अमेरिका यांच्यातील अणुकरारामुळे दक्षिण अशियातील शांतता धोक्यात आल्याचा जावईशोध पाकिस्तानने लावला आहे, तर सुरक्षा परिषदेत भारतााला कायमचे सदस्यत्व मिळणेही दक्षिण अशियासाठी धोक्याचे आहे, अशी ओरड पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी चालविली आहे. अणु पुरवठादार संघटनेच्या नियमातून भारताला विशेष सवलत देण्यासही त्यांनी विरोध केला आहे.
अणुऊर्जा करारामुळे शांतता धोक्यात
By admin | Updated: January 29, 2015 01:24 IST