जोहान्सबर्ग : बीअर पिण्याचा शौक असलेले लोक सुटीच्या दिवशी हमखास बारमध्ये जातात. मात्र, जर एखादा प्राण्याने असेच केले तर... तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, जोहान्सबर्ग येथील एक जिराफ नित्यनेमाने बारमध्ये हजेरी लावतो. पर्डी नावाचा हा जिराफ जोहान्सबर्गच्या लॉयन पार्कमध्ये राहतो. त्याला बीअर बार एवढा आवडतो की, ताजातवाना होण्यासाठी तो जवळच्या बारमध्ये जातो. जिराफाची ही कृती पाहून बारमधील लोक आश्चर्यचकित होतात. जिराफ बारमध्ये आल्यानंतर सर्वात आधी आपल्या पोटोबाचे पाहतो. तो दररोज बारमध्ये येतो. त्यामुळे आता पर्यटकही त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बारमध्ये येत आहेत. जिराफमुळे आपला धंदा वाढत असल्यामुळे बारमालकही त्याची आतुरतेने वाट पाहतो. दररोज नियमित वेळेला येणारा हा जिराफ पेयपान आणि भोजन होईपर्यंत बारमध्येच थांबतो. बारमालक स्वत: त्याच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करतो.
दररोज बीअर बारमध्ये जाणारा जिराफ
By admin | Updated: April 6, 2017 04:49 IST