शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

भुरटे म्हणताहेत, आम्हालाही जगू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 12:17 PM

काही गुन्हेगारांनी तर निनावी, बनावट नावानं आपली आपबिती कथन करताना म्हटलं आहे, ठीक आहे, आमचा ‘धंदा’ वेगळा आहे, पण आम्हीही माणूसच आहोत ना, कोरोनाच्या काळात निदान आम्हाला जगण्यापुरतं तरी ‘खायला’ देणार की नाही? 

ठळक मुद्देकोरोनाच्या भीतीनं लोकं आणि गुन्हेगारही आता फारसं घराबाहेरच पडत नसल्यानं पारंपारिक गुन्हेगारीला आपोआपच आळा बसला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

 जगभरात लोकांनी आज स्वत:ला घरात कोंडून घेतलं असल्यानं ठिकठिकाणच्या पारंपरिक गुन्हेगारीचा दरही मोठय़ा प्रमाणात घटला आहे. केवळ भारतातच नाही, जगभरात हीच स्थिती आहे. चोर्‍या, लुटमार, घरफोड्या, लोकांना रस्त्यांत एकटंदुकटं गाठून त्यांना लुटणं, महिलांच्या अंगावरचं सोनं, त्यांचे दागिने लुटून पसार होणं. अशा घटना सगळीकडेच घडत असतात. पण कोरोनाच्या भीतीनं लोकं आणि गुन्हेगारही आता फारसं घराबाहेरच पडत नसल्यानं पारंपारिक गुन्हेगारीला आपोआपच आळा बसला आहे. युरोपात तर कोरोनाचा प्रसार मोठय़ा वेगानं होत असल्यानं तिथल्या पारंपरिक गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली आहे. यासंदर्भात स्पेनच्या पोलीस खात्याचे उपसंचालक सांगतात, आमच्याकडे या गुन्हेगारीचा दर कधी नव्हे एवढा कमी झाला आहे. या गुन्ह्यांचं प्रमाण तब्बल पन्नास टक्क्यांच्याही खाली आलं आहे. स्वीडनच्या पोलीस अधिकार्‍यांचं म्हणणं आहे. या नेहमीच्या गुन्ह्यांमध्ये, त्यांचा शोध घेण्यात आमचा प्रचंड वेळ जायचा, सुदैवानं तो वेळ आम्हाला आता आमच्या देशांतील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी, कायदा-सुव्यवस्था पाहण्यासाठी वापरता येतोय.ऑस्ट्रियाचे अंतर्गत मंत्री कॅरी नेमर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी, गुन्हेगार आता आपली मोडस ऑपरेंडी बदलत असून नव्या गुन्हेगारीचा, विशेषत: ऑनलाइन गुन्हेगारीकडे ते वळले आहेत. र्जमनीच्या काही गुन्हेगारांनी तर निनावी, बनावट नावानं आपली आपबिती कथन करताना म्हटलं आहे, ठीक आहे, आमचा ‘धंदा’ वेगळा आहे, पण आम्हीही माणूसच आहोत ना, कोरोनाच्या काळात निदान आम्हाला जगण्यापुरतं तरी ‘खायला’ देणार की नाही? आमच्यावर असा अन्याय करू नका.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या