शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! जीव वाचवणाऱ्या मास्कची निर्मिती; ब्रिटिश संशोधकांनी शोधलं अनोखं तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:35 IST

ब्रिटिश संशोधकांनी शोधलेले तंत्रज्ञान तिसऱ्या लाटेचा सामना करताना भारतासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारतात प्राणवायूच्या अभावी तसेच कृत्रिम श्वसनयंत्रणेच्या (व्हेंटिलेटर) टंचाईमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले. अशा स्थितीत तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. ब्रिटिश संशोधकांनी शोधलेले तंत्रज्ञान तिसऱ्या लाटेचा सामना करताना भारतासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. वार्विक विद्यापीठ आणि बेलफास्टचे क्वीन्स विद्यापीठ या दोन्ही संस्थांमधील संशोधकांनी एपनिया मास्क म्हणजेच ‘कंटिन्यू पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर’ (सीपीएपी) मशीन गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर जाण्यापासून रोखण्यात मोलाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट केले आहे. सीपीएपीच्या या उपचारपद्धतीत उर्ध्व श्वसनमार्गाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी फुफ्फुसांमध्ये हवा भरली जाते. म्हणजेच श्वसननलिकेच्या वरील भाग निष्क्रिय होण्यापासून वाचतो आणि दाबामुळे फुफ्फुसांमध्ये हवाही जाते.  एपनिया मास्क महत्त्वाचाइंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर यांच्या मतानुसार १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात गेल्या वर्षापर्यंत सुमारे ४० हजार व्हेंटिलेेटर होते. सद्य:स्थितीत ही संख्या ५७,५१८ एवढी आहे. देशात आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. अशा स्थितीत एपनिया मास्क हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. ६३ टक्के लोकांना म्हणजेच ३७७ लोकांपैकी २४० लोकांना सीपीएपी उपचारपद्धतीमुळे व्हेंटिलेटरची गरज पडली नाही. मृत्यूदर घटतो- सीपीएपी उपचारपद्धती घेणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये मृत्यूदर कमी असल्याचे संशोधनात आढळून आले. एका एअर फिल्टरच्या माध्यमातून ट्यूबने शद्ध हवा बाधिताच्या नाक वा तोंडाजवळ एपनिया मास्कने पोहोचते.रुग्णाला झोपेतही प्राणवायूचा पुरवठा अखंड राहतो. कोरोनाची बाधा झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात एपनिया मास्कची उपचारपद्धती उपयुक्त ठरते.  घोरणाऱ्या लोकांसाठी हा मास्क विशेष उपयुक्त ठरणारा आहे. सीपीएपी मशीनचे कॉम्प्रेसर हवेच्या दाबात सातत्य ठेवते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या