शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शौर्य हाच विकासाचा आधार

By admin | Updated: July 6, 2017 02:02 IST

भारत आणि इस्रायलचे संबंध परस्पर विश्वास, मैत्री आणि सांस्कृतिक वारशावर प्रस्थापित झाले आहेत. इस्रायलच्या शौर्याला मी प्रणाम करतो.

तेल अवीव : भारत आणि इस्रायलचे संबंध परस्पर विश्वास, मैत्री आणि सांस्कृतिक वारशावर प्रस्थापित झाले आहेत. इस्रायलच्या शौर्याला मी प्रणाम करतो. हेच शौर्य इस्रायलच्या विकासाचा पाया आहे. संख्या आणि आकार एवढा महत्त्वाचा नाही, हे इस्रायलने जगाला सिद्ध  करून दाखविले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भारत व इस्रायलच्या अतूट संबंधांची अनेक उदाहरणे दिली. इस्रालयच्या ऐतिहासिक भेटीवर असलेल्या मोदी यांनी बुधवारी तेल अवीव येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. हिब्रूतून सुरू केलेल्या भाषणात त्यांनी भारत व इस्रायलच्या अतूट संबंधांची अनेक उदाहरणे दिली. इस्रायली नागरिक अनेक क्षेत्रांत व्यापक काम करीत असल्यामुळे १२ जणांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. इस्रायलची उभारणी करण्यात भारतातून आलेल्या नागरिकांनी भरीव योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले. हृदयात स्थान असलेल्यांना कागदपत्रांची गरज नसते. त्यामुळे ओसीआय (ओव्हरसिज सिटिजन आॅफ इंडिया) कार्ड मिळणार नाही, असे इस्रायली समूदायांच्या बाबत होणार नाही, अशी ग्वाहीही मोदी यांनी दिली. तसेच इस्रायलमध्ये लष्करी सेवा देणाऱ्यांच्या कुटुंबाला ओसीआय कार्ड मिळेल, अशी खात्रीही त्यांनी दिली.  इतक्या वर्षांच्या संबंधानंतरही इस्रायलमध्ये इंडियन कल्चरल सेंटर नाही. मात्र, लवकरच असे सेंटर सुरू करण्यात येईल. भारत तुमच्या हृदयात आहे. इंडियन कल्चरल सेंटर तुम्हाला सदैव भारतीय संस्कृतीशी जोडलेले ठेवेल. इस्रायलमधील भारतीयांना कायम भारतात यावे अशी इच्छा व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली-मुंबई-तेल अविव विमान सेवा सुरू करणार असल्याची घोषणाही यावेळी केली. इस्रायलमध्ये मराठी भाषेतून मायबोली हे नियतकालिक निघते, हे मोदींनी अभिमानाने सांगितले. २०२२ हे भारताच्या स्वातंत्र्याचे  ७५ वे महत्त्वाचे वर्ष असल्यामुळे तोपर्यंत देशातील सर्व गरिबांना  घरे देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. घरांबरोबरच वीज व पाणी आदी सुविधाही देण्यात येणार आहेत, अशी घोषणा मोदी यांनी केली.